encroachment demolished from pratapsinhnagar near satara saam tv
महाराष्ट्र

प्रतापसिंहनगर : साताऱ्यात गुंडाच्या घरावर चालवला बुलडाेझर, 16 घरे प्रशासनाच्या रडारावर

Satara Latest Marathi News : साताऱ्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने ठाेस पाऊल उचलल्याची चर्चा सातारा शहरातील चाैका चाैकात सुरु आहे.

ओंकार कदम

Satara :

सातारा शहरानजीक असलेल्या प्रतापसिंहनगर येथे गुंड दत्ता जाधव (datta jadhav pratapsinhnagar) आणि अन्य गुंडांच्या घरावर प्रशासनाने आज (बुधवार) बुलडोजर फिरवला. या धडक कारवाईमुळे प्रतापसिंहनगर परिसरात एकच खळबळ उडाली. पाेलिसांनी परिसरात बंदाेबस्त ठेवला आहे. दरम्यान या कारवाईमुळे उत्तरप्रदेश प्रमाणे सातारा येथे देखील सराईत गुंड, समाजविघातक घटकांच्या विराेधात प्रशासन आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra News)

साताऱ्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठाेस पाऊल उचलल्याची चर्चा सातारा शहरातील चाैका चाैकात सुरु आहे. आज पहाटेच्या सुमारास साताऱ्यातील गुंड दत्ता जाधव याचे घर पडण्याचे काम प्रशासनाने अत्यंत गुप्तता पाळत या कारवाईस प्रारंभ केला.

या कारवाईत दत्ता जाधव याच्यासह एकूण 16 घरांवर बुलडाेजर चालविण्यात येणार असल्याचे समजते. आता पर्यंत 6 घरे जमीनदाेस्त करण्यात आली आहेत. या कारवाईत अडथळा येऊ नये यासाठी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त प्रतापसिंहनगर येथे कार्यरत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी 'ही' 5 कामं नक्की करा; घरात लक्ष्मीचं होईल आगमन

Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा असंवेदनशीलतेचा कळस, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस!

SCROLL FOR NEXT