AI in Farming Saam tv
महाराष्ट्र

AI in Farming : बारामतीच्या शेतातल्या AI प्रयोगाची जगाकडून दखल; सत्या नडेला यांच्यानंतर इलॉन मस्क यांच्याकडून कौतुक

AI in Farming News : बारामतीच्या शेतातल्या AI प्रयोगाची जगाने दखल घेतली आहे. आधी सत्या नडेला यांनी कौतुक केलं. त्यानंतर इलॉन मस्क यांनी बारामतीच्या एआय प्रयोगाच्या शेतीचं कौतुक केलं.

Saam Tv

बारामतीच्या शेतातल्या AI प्रयोगाची जगभारत चर्चा होत आहे. बारामतीच्या कृषी विकास ट्रस्टच्या शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलाय. बारामतीमधील कृषी बारामतीमधील शेतातील एआय प्रयोगाची मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्य नडेला यांच्यानंतर 'एक्स'चे मालक इलॉन मस्क यांनीही कौतुक केलं आहे.

सत्य नडेला काय म्हणाले?

सत्य नडेला म्हणाले, 'बारामतीत लहान शेतकरी कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करून शेतीमध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेतातील केमिकलचं प्रमाण कमी होत आहे. त्याचबरोबर पाण्याचा वापर देखील कमी होऊ लागला आहे'.

'कृत्रिम बुद्धिमतेचा वापर वाढल्याने उत्पन्न देखील वाढू लागले आहे. शेतकरी त्यांच्या भाषेत प्रश्न विचारून त्याचं उत्तर कृत्रिम बुद्धितद्वारे मिळवत आहेत, असेही नडेला म्हणाले. सत्य नडेला यांच्या पोस्टवर इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली. मी आणखी या तंत्रज्ञानात सुधारणा करणार असल्याचं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे .

कृषी विकास ट्रस्टची स्थापना कुणी केली?

बारामतीमधील कृषी विकास ट्रस्टची स्थापना ही शरद पवार आणि त्यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांनी १९६८ साली केली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश कृषी आणि शैक्षणिक विकास घडवण्याचा आहे. कृषी विकास ट्रस्टच्या सुरुवातीला उपक्रमांमध्ये पुण्यातील बारामतीत दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी पाझर तलावांचे बांधकाम केलं होतं. या ट्रस्टद्वारे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीसाठीही पाण्याचा पुरवठा होऊ लागला. ही संस्था आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत करत आहे.

प्रकल्पाचे महत्व समजू लागले - प्रतापराव पवार

अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार म्हणाले, इलॉन मस्क यांनी बारामतीतील या प्रकल्पाची दखल घेतली आहे. ही बाब या प्रकल्पाचं मोठं यश आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झालाय. कृत्रीम बुद्धीमत्तेचे सकारात्मक परिणाम जगभरातील कृषी क्षेत्रावर होतील, याची कल्पना मस्क यांना आहे. त्यामुळे त्यांनी प्रकल्पाची स्वत:हून दखल घेतली आहे.

'बारामतीतील प्रकल्पाला जागतिक मान्यताही मिळू लागली आहे. हे याचं यश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सातत्याने प्रशिक्षण आणि संशोधनासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे ही बाब शक्य झाली आहे. प्रकल्पाचे महत्व हळुहळू सर्वांना समजू लागलं आहे, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी सांगितले.

मस्क यांनी दखल घेणे आशादायक - राजेंद्र पवार

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले, 'आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे. ही बाब ऊसाच्या माध्यमातून अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सिद्ध केली आहे. संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, डॉ. अजित जावकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून यश मिळालंय. इलॉन मस्क यांनी प्रयोगाची दखल घेणं ही बाब खूप आशादायक आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT