Ravikant Tupkar संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana : 'शेतकऱ्यांना वाचवा..' बुलढाण्यात तुपकरांची सरकारला आर्त हाक

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : देशातील शेतकरी सातत्याने संकटात आहे. यावर्षी नैसर्गिक व सुलतानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. असंख्य शेतकरी Farmers आजही आत्महत्या करीत आहेत. अतिवृष्टीने खरीप गेलं आता रब्बी पीक घेण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही आणि अशा संकटातही केंद्र व राज्य सरकार (Central and State Governments) शेतकऱ्यांकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे. तसेच या देशातील शेतकरी वाचवा अशी आर्त हाक तुपकरांनी यावेळी दिली आहे.

हे देखील पहा -

शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी बांधव सामील झाले होते. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, लोकडाऊन मधील वीज बिल पूर्ण माफ करा , शेतकऱयांचे वीज कनेक्शन कापणे बंद करा या मागण्या घेऊन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शहरातील मोठी देवीला साकडे घालून जिल्हाधिकारी कार्यलयावर (Buldhana Collector's Office) मोर्चा धडकला. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान या मोर्चामध्ये असंख्य शेतकरी महिला सामील झाल्या होत्या , तसेच बैलगाड्या, ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मागण्यांचे फलक हातात घेऊन मोर्चा मद्धे सरकार विरोधात घोषणाबाजी करीत सामील झाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT