Ulhasnagar News : उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात (Ulhasnagar Hospital) मंगळवारी सकाळी 11 पासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर अवघ्या दीड तासांत विद्युत पूरवठा पुर्ववत झाल्याने नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी साम टीव्हीचे आभार मानले. (Maharashtra News)
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचा सकाळी 11 वाजता विद्युत पूरवठा खंडीत झाला. येथे 200 खाटा रुग्णांनी भरलेल्या हाेत्या. परंतु कोणतीही सोय या रुग्णालयात रात्रीपर्यंत करण्यात आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता.
या रुग्णालयात नवजात बालक तसेच लहान मुलांचा कक्ष आहे. या वार्डांमध्ये लाईट नसल्याने गर्मीने रुग्ण त्रासले होते. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाईल टॉर्चवरती रुग्णालयात जावे लागत होते.
हा विद्युत पुरवठा सकाळी 11 वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत बंद होता. याबाबतीत रुग्णालयाचे अधीक्षक मनोहर बनसोडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जनरेटर सप्लायर यांच्यातील वादामुळे रुग्णालयात अंधार पसरल्याचे समजले.
या दाेन्ही ठिकाणी रुग्णालयातर्फे पत्र देण्यात आले हाेते. त्यांनी अजून पर्यंत हे काम केले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. अखेर साम टिव्हीच्या दणक्याने विद्युत पुरवठा सुरळीत झाला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.