Electric Vehicle News  Saam Digital
महाराष्ट्र

Electric Vehicle News : विजेवरील वाहनांना महाराष्ट्राची ‘पॉवर’; राज्यात सर्वाधिक ३२१६ EV चार्जिंग स्टेशन

Electric Vehicle News Update: देशभरात सुमारे १२ हजार १४६ चार्जिंग स्टेशन आहेत. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३ हजार २१६ चार्जिंग स्टेशन आहेत. त्यावरून विजेवरील वाहनांना महाराष्ट्राची पॉवर मिळत असल्याचे स्पष्ट होते.

Sandeep Gawade

Electric Vehicle Power Station

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारकडून विजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे देशभरात विजेवरील वाहनांच्या वापराचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र, अशा वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्ही स्टेशनचा विचार करता देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. देशभरात सुमारे १२ हजार १४६ चार्जिंग स्टेशन आहेत. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३ हजार २१६ चार्जिंग स्टेशन आहेत. त्यावरून विजेवरील वाहनांना महाराष्ट्राची पॉवर मिळत असल्याचे स्पष्ट होते.

देशात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनेही झपाट्याने वाढत आहेत. सध्या देशात जवळपास २८ कोटी वाहने असून ती पेट्रोल-डिझेलवर धावतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत असल्याने हवेचे प्रदूषण होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र, सदरची वाहने चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारणे आवश्यक आहे. त्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून त्यांच्याकडे ३ हजार २१६ चार्जिंग स्टेशन आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत १ हजार ८८६ आणि तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकात १ हजार ४१ चार्जिंग स्टेशन आहेत. इतर राज्यांमध्ये सदरचा आकडा तीनशे-चारशे एवढा कमी आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महामार्गाबरोबरच शहरातही उभारणी

महाराष्ट्रात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढावी, त्यांना अखंडित वीजपुरवठा केला जावा म्हणून राज्य सरकारने महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नेमले असून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. राज्यात सध्या महामार्गावर, प्रमुख शहरात आणि हौसिंग सोसायट्यांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत.

इतर राज्यांतील चार्जिंग स्टेशन

महाराष्ट्र : ३,२१६

दिल्ली : १,८८६

कर्नाटक : १,०४१

केरळ : ८५२

तमिळनाडू : ६४३

उत्तर प्रदेश : ५८२

राजस्थान : ५००

तेलंगण : ४८१

गुजरात : ४७६

मध्य प्रदेश : ३४१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT