नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानं प्रचाराचा धुरळा उडत होता.. मात्र निवडणूक आयोगाने 20 नगरपालिका आणि 61 पालिकांमधील 130 प्रभागाचं मतदान पुढं ढकलण्याचा निर्णय घेतलाय.. या नगरपालिका निवडणूका 20 डिसेंबरला तर मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे...अवघे 24 तास बाकी असताना आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्यानं उमेदवारांकडून संताप व्यक केला जातोय . एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनीही आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय..
दुसरीकडे काँग्रेसनेही स्थगितीच्या निर्णयावर आगपाखड केलीय.. आतापर्यंत आयोग झोपला होता का? असा सवालच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय...
खरंतर राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे.. मात्र यापैकी 23 नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सर्व जागा तसंच 61 नगरपालिकांच्या 130 प्रभागाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगानं घेतलाय...
कोणत्या नगरपरिषदांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय..
23 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती
अमरावती विभाग-
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम
कोकण विभाग-
अंबरनाथ
छ.संभाजीनगर विभागातील
फुलंब्री
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती दिलीय.
नागपूर विभाग-
घुग्घूस
देवळी
नाशिक विभाग-
देवळाली-प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा
पुणे विभाग-
बारामती
फुरसुंगी-उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अनगर
खरं तर 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात आली...त्यानंतर 4 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.. आधी विरोधकांनी मतदारयाद्यातील घोळावर आक्षेप घेतले होते.. तर आता 23 नगरपरिषदांची निवडणूकच स्थगित करावी लागल्यानं आयोगाचा गोंधळ उघड झालाय... त्यामुळे आता नव्यानं कार्यक्रम जाहीर झाल्यानं प्रचारासाठी मोठा खर्च केलेले उमेदवार संतापले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनाला तर पुन्हा तयारी करावी लागणार आहेच पण उमेदवारांनाही आपापल्या भागात निवडणुकीचं वातावरण कायम राखण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.