Election Commission postpones Maharashtra Municipal Council elections; new dates announced after district court proceedings. Saam tv
महाराष्ट्र

Local Body Election: नगरपरिषद निवडणुकीला ब्रेक; मतदानाच्या एक दिवसाआधी आयोगाचा मोठा निर्णय

Municipal Council Polls : मतदानाला काही तास शिल्लक असतानाच निवड़णुक आयोगानं नगरपरिषदेच्या निवडणुकीला ब्रेक लावला आहे. राज्यातील काह ठिकाणची निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. पाहूया एक रिपोर्ट.

Suprim Maskar

निवडणुकीच्या प्रचारातील 30 नोव्हेंबरचा 'सुपर संडे' चांगलाच चर्चेत आलाय. कारण मतदानाला काही तास शिल्लक असतानाच निवड़णुक आयोगानं नगरपरिषदेच्या निवडणुकीला ब्रेक लावला आहे. निवडणूक आयोगाने 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतींसाठी आता 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल असं जाहीर केलंय. जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. यासंर्दभात जिल्हा न्यायालयानं निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.

निवडणुका कुठे लांबणीवर?

बारामती

फलटण

महाबळेश्वर

मंगळवेढा

कोपरगाव

देवळाली

पाथर्डी

बाळापूर

अंजनगाव सुर्जी

अंबरनाथ

ऐनवेळेस निवडणूका पुढे ढकल्यानं राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केलाय. बहुमतासाठी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची ही छुपी युती असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय. तर या निर्णयावर ठाकरे सेनेनेही टीका केली आहे. ज्यांनी यंत्रणेचा वापर केला त्यांना पैसे वाटपाची अजून संधी मिळणार, असा टोला लगावला आहे.

मतदार यांद्यामधील घोळामुळे आधीच निवडणूक आयोगावर विरोधक तुटून पडले आहेत. त्यात राजकीय आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचे कान टोचले आहे. आता अगदी मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही ठिकाणी निवडणूक पुढे ढकलल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झालाय. तांत्रिक कारणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे.मात्र त्यामुळे प्रशासनाला तर पुन्हा तयारी करावी लागणार आहेच पण उमेदवारांनाही आपापल्या भागात निवडणुकीचं वातावरण कायम राखण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT