Zilla Parishad Election 2026 saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडाला; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक

Maharashtra Local Body Election: राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला. मतदान कधी होणार आणि निकाल कधी लागणार? हे जाणून घ्या...

Priya More

Summary:

  • १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा

  • राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम केला जाहीर

  • ५ फेब्रुवारीला मतदान होणार

  • ७ फेब्रुवारीला निकाल लागणार

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयागाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा केली. ५ फेब्रुवारीला मतमोजणी होणार तर ७ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून आजपासून कामाला सुरूवात केली जाईल.

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला निकाल मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंतची मुदत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२६ असेल.

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला होता. पण राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांसाठीचा कालावाधी वाढवून देण्यात यावा यासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करत सोमवारी सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी रोजी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने ज्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर केली आहे त्यामध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. त्याचसोबत १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका देखील होणार आहेत. तर उर्वरीत २० जिल्हा परिषदा आणि २२६ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असल्यामुळे त्यांच्या निवडणुका नंतर होणार आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे वेळापत्रक -

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी - १६ जानेवारी ते २१ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत)

नामनिर्देशनपत्रांची छाननी - २२ जानेवारी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी

मतदान - ५ फेब्रुवारी (सकाळी साडेसात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

मतमोजणी - ७ फेब्रुवारी २०२६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT