Elderly Farmer in Latur ploughs feild himself Saam tv news
महाराष्ट्र

Latur Farmer: शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना; सर्जा-राजा नसल्यानं ६५ वर्षीय शेतकऱ्यानं स्वत:लाच जुंपलं औताला; अंबादास पवार म्हणतात...

Struggle of latur farmer: लातूर जिल्ह्यातील ६५ वर्षीय अंबादास पवार आर्थिक अडचणींमुळे स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि बैलांचा अभाव यामुळे त्यांची ही मजबुरी.

Bhagyashree Kamble

कृषीप्रधान देशाला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी सरकार विविध योजना राबवतात. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना म्हणून एका ६५ वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच औताला जुंपून शेतात मशागत केली आहे. हा काबाडकष्ट करणारा शेतकरी लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील रहिवासी असून, त्यांनी सरकारकडे कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे.

अंबादास गोविंद पवार हे हाडोळती येथील रहिवासी आहेत. अडीच एकर कोरडवाहू जमिनीचे ते मालक आहेत. ६५ वर्षापर्यंत पवार शेतात राबले. या वर्षी त्यांचं शरीर थकलं. मात्र, तरीही या वयात पवार शेतात राबत असल्याचं दिसतंय. शेतीचा खर्च परवडच नसल्यामुळे त्यांनी बैलाच्या ठिकाणी औताला बांधून स्वत:ला झुंपवून घेतलं. गेल्या सात ते आठ वर्षांपासून याच प्रकारे ते शेतात काम करीत आहेत.

पेरणीपूर्वी मशागत, पेरणी, खतांचा खर्च या गोष्टींचा खर्च परवडत नसल्यामुळे पवार आणि त्यांची पत्नी शेतात राबतात. ट्रॅक्टर, बैलाचा नांगर यासाठी पैसे अधिक लागतात. या वस्तूंसाठी त्यांच्याकडे नसल्यामुळे ते स्वत:ला औता घेऊन शेतात राबतात. ६५ वर्षांचे पवार आणि ६० वर्षांची त्यांची पत्नी मिळून दोघेही शेतात राबतात.

अंबादास गोविंद पवार आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांना एक मुलगी आहे. जिचे लग्न झालंय. मुलगा पुण्यात छोटे - मोठे काम करतो. सून आणि दोन्ही नातू गावात राहतात. नातवांचे शिक्षण आणि स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी पती - पत्नी शेतात राबतात. बैलाच्या नांगरणीसाठी दिवसाला अडीच हजार आणि ट्रॅक्टरसाठी त्याहून अधिक पैसे खर्च होतात. त्यामुळे दोघेही औत घेऊन शेतात राबतात. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा आणि कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वकीलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

Shivali Parab : "वेड तुझे..."; शिवाली परबचा 'तो' VIDEO पाहून बॉलिवूड अभिनेत्यानं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT