Maharashtra New CM : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच आणखी वाढला आहे. विधानसभेच्या निकालाला चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झाले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही मुख्यमंत्रिपदाचीच मागणी करण्यात येत आहे. महायुतीमधील मुख्यमंत्री पदाचा पेच वाढतच चालला आहे. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रिपदाऐवजी दोन प्रस्ताव दिले होते. एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत नवा प्रस्ताव दिल्याचे समोर आलेय.
एकनाथ शिंदेंचा भाजपला प्रस्ताव -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपने दिलेला उपमुख्यमंत्र आणि केंद्रातील मंत्रिपदाचा प्रस्ताव धुडकावलाय. एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव दिल्याचे समजतेय. एकनाथ शिंदे यांनी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.
येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री कोण याचा निर्णय होऊ शकतो. ३० नोव्हेंबर किंवा २ डिसेंबरला शपथविधी होईल. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते येणार असल्यामुळे या तयारीसाठी हा मधला वेळ घेतला जात आहे. दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर होईल. मेगा शपथविधीच्या तयारीसाठी वेळ घेतला जातोय. एकनाथ शिंदे हेच CM होणार आहेत.संजय शिरसाट
फडणवीसच मुख्यमंत्री होणार? Maharashtra CM suspense to end today?
भाजप महायुतीचा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, अशी माहिती समोर आली आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव स्विकारण्यासठी ७२ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
केंद्रात मंत्रीपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ॲाफर देण्यात आली आहे. दोन्हीपैकी एकाची निवड करा, अशा सूचना भाजप पक्षश्रेष्टींकडून देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भाजपचे २ केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल होणार आहेत. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आळे आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वाचच लक्ष लागलेय.
शिंदेंच्या शिवसेनेचं दबावतंत्र -
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपावर शिवसेना शिंदे गटाकडून दबावतंत्र वापरण्यात येत असल्याचे समजतेय. पण शिवसेना शिंदे गटाच्या दबावापुढे झुकण्यास भाजप तयार नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाला भाजप वरिष्ठांकडून समंती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा आजच होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.