Political tensions rise in Maharashtra as ‘Operation Tiger’ speculation fuels possible split in Shiv Sena ranks. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

महाराष्ट्रात भूकंप होणार, महिनाभरात ठाकरेंचे आमदार-खासदार फुटणार, मंत्र्यांच्या दाव्यानं खळबळ

Shinde vs Thackeray latest updates : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा रंगली आहे. संजय शिरसाट यांनी एका महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि खासदार फुटण्याचा दावा केला आहे.

Namdeo Kumbhar

चेतन व्यास| वर्धा प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Operation Tiger Maharashtra political crisis : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार एका महिन्यात फुटणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते वर्धा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेला दुजोरा देत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. पुढील एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला दिसेल, असे सूचक विधानही यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याची बातमी प्रसारात झाली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने याला आणखी बळ मिळलेय.

योग्य वेळीला ऑपरेशन टायगर -

एका महिन्यात तुम्हाला ऑपरेशन टायगरचा प्रत्यय येईल. उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदार काय आमदार काय हे सर्व पहिल्यापासून आमच्या संपर्कात आहेत. निवडणूक झाली तेव्हापासून सर्वजण संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर केव्हा करायचं, हे एकनाथ शिंदेसाहेब योग्य वेळेला निर्णय घेतील, असे शिरसाट म्हणाले.

उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे.
एकनाथ शिंदे - मुख्य नेते, शिवसेना

आमदार-खासदारांची ठाकरेंसोबत राहण्याची मानसिकता नाही -

उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत, कुणासोबत बोलत नाहीत, कुणाच्या अडचणी समजून घेत नाहीत, त्यामुळेच आम्ही उठाव केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे जे खासदार-आमदार आहेत, पण त्यांच्या पक्षांमध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार-आमदारांची नाही. त्यांना सर्वात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे एकनाथ शिंदे आहेत. म्हणून एका महिन्यात तुम्हाला ऑपरेशन टायगरचा प्रत्यय येईल, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

मरेपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार - सावंत

जगू तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच. मला उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबतच राहणार असल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. जर बैठक झाली असेल तर फोटो प्रसारित करावेत, असे आव्हानही त्यांनी केले. शिवसेनेशी प्रतारणा म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे आहे. उद्धव ठाकरे यांच्या एका फोनवर मी मंत्रीपदही सोडले होते. मानहानी खटला दाखल करण्याचा इशारा सावंत यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Ladki Bahin Yojana : जुलैची ३ तारीख उजाडली, लाडक्या बहि‍णींना जूनचे १५०० कधी मिळणार? तारीख आली समोर

Rain Alert : पुण्यासह रायगडला रेड अलर्ट; पुढील ७२ तास महत्त्वाचे, राज्यात पावसाची दमदार बॅटिंग

Thane rain : ठाण्यात पावसाचा पहिला बळी! १७ वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ

Fact Check: 10वी, 12 वी पासवाल्यांसाठी सरकारी नोकरी? केंद्र सरकारने काढली बंपर भरती?

SCROLL FOR NEXT