Eknath Shinde Shiv Sena MLA Minister list : महायुतीच्या सत्तास्थापनेला वेग आलाय. मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप निश्चित झाले नाही. पण शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राला ३१ वा मुख्यमंत्री मिळणार आहे. पण त्याआधी महायुतीमध्ये खातेवाटपावरुन तिढा असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या बैठकीत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल, असे बोलले जात आहे. पण त्याआधी एखनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची मुंबईत बैठक बोलवली आहे, त्यामध्ये ते संबोधित करणार असल्याचे समजतेय.
महायुतीमध्ये शिवसेनेला १२ ते १३ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदे शिवसेनेला किती मिळतील, हे अद्याप समोर आलेले नाही. गृहमंत्रालयावरून खातेवाटप रखडल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितले. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली आहे.
येत्या नव्या मंत्रिमंडळात ४ नव्या आमदांराची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर ४ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आज वर्षावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय.
एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री होते?
उदय सामंत
दीपक केसकर
शंभूराज देसाई
दादा भुसे
गुलाबराव पाटील
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
संदीपान भुमरे (सध्या खासदार)
संजय राठोड
सत्ता स्थापनेवेळी आमदारांच्या कार्यक्षमता, वर्तणूक इतिहास विचारात घेऊन मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती आहे. कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी (वादग्रस्त) नसलेला चेहरा मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. त्यानुसार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय गुलाबराव पाटील यांच्यावरही टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. संदीपान भुमरे सध्या खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी कुणाला संधी मिळते? हे पाहणेही औत्सुक्याचं ठरणार आहे.
जुने चेहरे टाळून नव्या चेहऱ्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. खाते वाटपही त्याच धर्तीवर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातेय. त्याशिवाय महिला चेहराही मंत्रिमंडळामध्ये घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मागील मंत्रिमंडळात असमारे उदय सामंत, दीपक केसकर, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांच्या नावाची शिवसेनेत मंत्रिपदाची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.