Shiv Sena leader Beed Saam TV Marathi
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये शिंदेंच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे खळबळ, नेमकं झालं काय?

Maharashtra political controversies : बीड जिल्ह्यात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस आणि आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला असून पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Shiv Sena leader suicide attempt in Beed : एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बीड जिल्ह्यातील एकच खळबळ उडाली. उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा येथे हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर बीडमध्ये (Beed district breaking news) शिंदेंच्या शिवसेनेत एकच खळबळ उडाली असून देवकतेंनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा सुरू आहे. (Bharat Devkate health update)

शिंदेंच्या शिवसेनेचे बीड जिल्ह्यातील उपतालुकाप्रमुख देवकते यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवणार होते. पण साडी तुटल्यामुळे ते खाली पडले अन् देवकते यांचा जीव वाचला. देवकते यांनी टोकाचे पाऊल उचलण्याआधी व्हॉट्सअॅप स्टेट्‍स (WhatsApp status suicide note controversy) ठेवले होते. त्या स्टेट्‍समधील नावांमुळे आणि माहितीमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल बीडमधील शिवसेनेच्या नेत्यांकडून घेण्यात आली आहे. या प्रकाराची सखोल माहिती घेण्यात येत असून त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देवकते यांची प्रकृती सध्या चितांजनक असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सरू आहेत.

बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र साडी फाटल्याने ते खाली पडले आणि त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी देवकते यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर चिठ्ठी आणि फोटो पोस्ट करत ‘दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र’ असा संदेश लिहिला. तसेच आपल्या मृत्यूसाठी गावचे सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर अंबाबाईच्या दर्शनाला; कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग, पाहा VIDEO

Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT