Eknath Shinde Uddhav Thackeray x
महाराष्ट्र

मरे हुए को क्या मारना; 'कम ऑन किल मी' चॅलेंजवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी 'कम ऑन किल मी, हिंमत असेल, तर अंगावर या' असे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वक्तव्य केले. यावर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

Yash Shirke

Shivsena : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर त्यातही शिंदे गटावर हल्लाबोल केला. भाषणादरम्यान त्यांनी 'कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदे गटाकडून वरळी एनएससीआय डोममध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली. 'मी चित्रपट पाहिला, तो नाना पाटेकर यांचा प्रहार चित्रपट होता. त्यात नाना गुंडासमोर उभा राहतो आणि कम ऑन किल मी असे म्हणतो. तसा मी गद्दारांच्या समोर उभा आहे आणि म्हणतोय कम ऑन किल मी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'हिंमत असेल तर या अंगावर. जर येणार असाल, तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा पिक्चर होता, ज्यात तो ॲम्ब्युलन्स घेऊन येतो, तसं तुम्ही येत असाल, तर ॲम्ब्युलन्स घेऊन या', असे म्हणत ठाकरे यांनी शिंदे यांना चॅलेंज दिले. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 'ते (ठाकरे) म्हणाले, कम ऑन किल मी, पण मरे हुए को क्या मारना' असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्रीपदासाठी ते (उद्धव ठाकरे) लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे वारसदार होणार! हिंदुत्त्वासाठी बाळासाहेबांनी मतदानाचा अधिकारही गमावला होता. पण त्यांनी हिंदुत्त्व सोडले नाही. त्याचे वारसदार म्हणणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane News : संतापजनक! ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी, रिक्षामध्ये तरुणीला मारण्याचा प्रयत्न

Tarkarli Tourism: पावसाळ्यात फिरायला जायचा प्लान करताय? मग तारकर्ली ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

Radhika Yadav: तिला वेश्या व्यवसाय करायला लाव..., बॅटमिंटनपटू राधिकाच्या वडिलांना मित्रांकडून टोमणे; जिवलग मैत्रिणीचा दावा

Bhushi Dam: लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी; पाहा,VIDEO

डाळ शिजवताना त्यावर पांढरा फेस का येतो ?

SCROLL FOR NEXT