Maharashtra politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra Local Body Election News : धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत वादग्रस्त विधान केलं आहे. “राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही” या वक्तव्याने राजकीय वादाला तोंड फुटलं असून, सर्वपक्षीय आघाडी सावंतांविरोधात तयार होत आहे.

Namdeo Kumbhar

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Tanaji Sawant controversy statement : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षातील संघर्ष अनेकदा समोर आला आहे. रायगड असो अथवा नाशिक दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे अनेकदा समोर आलेय. यात आता आणखी एक भर पडली, ती धाराशिवमधून.

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलेय. राष्ट्रवादीची औलद सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे वक्तव्य सावंत यांनी केलेय. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने राजकीय वादाचा नवा अंक सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

धाराशिवमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेय. ही राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्ते शिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केलेय. या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत मी सांगत होतो, याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल, असेही सावंत म्हणाले.

दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी सांगितले होते. असं सांगणारा महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे, असे तानाजी सावंत महणाले. तुम्हाला युतीची तत्त्वे जर माहीत नसतील तर तुम्ही कशासाठी युती करत आहेत, असेही वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी भूम येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत केले आहे. त्याचबरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाबद्दल संतापले.

तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र

भूम, परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येणार आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आमदार तानाजी सावंतांविरोधात एकत्र नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा धाराशिवमध्ये सुरू झाली आहे.

आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. मी एकला चलो रे चा नारा दिला नाही, मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता एकला चलो रे चा नारा दिला, त्यामुळे आम्हीही कुठे गाफील नाहीत, सर्व जागा लढवण्याची आमची तयारी आहे. भाजप, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी , काँग्रेस सर्व एकत्र येत आहेत, त्यातच आजच आमचा विजय आहे, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT