Hemlata patil  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का; मध्यरात्रीच झाले शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : कुठलेही ऑपरेशन सांगून होत नाही, ते झाल्यावर सांगितले जाईल असा दावा मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता, त्यानंतर मध्यरात्रीच दिल्लीमध्ये नाशिकच्या काँग्रेसच्या एका बड्या नेत्यासह ठाकरेंच्याही स्थानिक नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला.

Saam Tv

Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मध्य नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडल्याने नाराज असलेल्या काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. याच ठिकाणी हा पक्षप्रवेश करून शिंदेनी काँग्रेसला धक्का दिला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळून त्यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांना चांगली टक्कर दिली होती. या निवडणुकीत हेमलता पाटील यांना उमेदवारी न देऊन ती जागा ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांना दिली असल्याने त्या नाराज होत्या. तसेच ऐनवेळी ठाकरे गटाने एबी फॉर्म देऊनही आपली उमेदवारी हिसकावून घेतली असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

हेमलता पाटील या १९९६ मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांना शब्द देऊनही ती जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडल्याने त्या नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्या कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. अखेरीस त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदेंची काम करण्याची पद्धत ही विलासराव देशमुख यांच्यासारखी!

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हेमलता पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारखी आहे. शिंदे यांच्याकडून मी कोणत्याही पदासाठी आश्वासन घेतले नाही. काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये आजपर्यंत काम केले आहे. शिंदे यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर मला विलासराव देशमुख यांची आठवण येते. एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात आणि आता त्याच व्यक्तीची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं.

नाशिकमध्ये पुन्हा शिंदेंचा ठाकरेंना दे धक्का

नाशिकच्या माजी उपमहापौर तसेच सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या ठाकरे गटाच्या रंजना बोराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात असून, अजून कोणकोणते ऑपरेशन केले जातील याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्लीत शक्तीशाली स्फोट, आगीचे लोळ, धुराचे लोट; रस्त्यावर रक्ताचा सडा, हादरवून टाकणारे PHOTO

Puffed Chapati Tricks: चपाती तव्यावर नीट शेकत नाही? लगेचच वातड होते? मग ही भन्नाट टिप ठरेल बेस्ट

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT