Mla Sanjay Gaikwad
Mla Sanjay Gaikwad  Saam TV
महाराष्ट्र

...तर माझे कार्यकर्ते तंगडं तोडतील; शिंदे गटातील आमदाराने अधिकाऱ्यांना दिला दम

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : बुलडाण्याचे (Buldhana) आमदार संजय गायकवाड हे आपल्या निर्भीड वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. एकदा नव्हे तर अनेकदा त्यांचे विधानही वादग्रस्त देखील ठरलेले आहेत. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आता शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा त्यांनी एक विधान केलं. मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिला. (Mla Sanjay Gaikwad Latest News)

मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी जमीन शिल्लक नसल्याने वनविभागाने मेंढ्या चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागन्या घेऊन ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेनेच्या वतीने मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो मेंढपाळ बांधव-भगिनी सहभागी झाले होते.

दरम्यान वनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केल्या गेल्या, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली, अशा तक्रारी यावेळी मेंढपाळ बांधवांनी मांडल्या. याच मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याला सज्जड दम भरलाय.

'आमच्या मेंढपाळाला जर हात लावाल, तर माझे कार्यकर्ते तंगड तोडून परत येतील, वन अधिकाऱ्यांना जास्तच माज आला असेल, तर आमच्यात माज उतरवण्याची देखील ताकद आहे. अशा माजलेल्या सांडांची मस्ती उतरवण्याचे काम आपल्याला पुढच्या काळात करायचे आहे'. असा धमकीवजा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे अधिकारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT