Eknath Shinde vs Uddhav Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: गरज पडल्यास लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवू; शिंदे गटातील नेत्याचं विधान

Lok Sabha Election 2024: लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे? असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

Satish Daud

Minister Deepak Kesarkar on Lok Sabha Election

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदे गटाने देखील लोकसभेसाठी मतदारसंघाची तसेच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हावर निवडणूक लढवत असेल, तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे? असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर?

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सोमवारी सावंतवाडी येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. किरण सामंत लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा प्रचार करून निवडून आणू, असं दीपक केसरकर म्हणाले.

माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने मुंबई शहराला आठवड्यातून तीन दिवस वेळ देणार असल्याचंही केसरकरांनी सांगितलं.

पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल, तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे?, असा सवालही मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.

तसेच गरज पडल्यास आम्ही भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवू,असंही केसरकर म्हणाले. एकीकडे शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असताना, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चांना उधाण आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT