Pandharpur Takli Grampanchayat Sarpanch Election saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election : मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावंताच्या गळ्यात सरपंचपदाची माळ, ग्रामपंचायतीवर सेनेचा झेंडा

टाकळी नगरपंचायत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नूतन सरपंच संजय साठे यांनी सांगितले.

भारत नागणे

Pandharpur Takli Grampanchayat Sarpanch Election : पंढरपूर शहरालगतच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सरपंचपदी शिवसेनेचे संजय साठे (sanjay sathe elected as takli grampanchayat sarpanch) यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचयातीलच्या उपसरपंचपदी महादेव पवार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. (Maharashtra News)

पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत सोलापुर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांचे बंधु संजय साठे यांची तर उपसरपंचपदी भाजप परिचारक गटाचे महादेव विठ्ठल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील महायुतीचा थेट प्रत्यय या निवडणुकीत दिसून आला आहे.

या १७ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी लक्ष्मी टाकळी येथे पार पडली. यामध्ये वरील दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच आणि उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रिगण चव्हाण यांनी जाहीर केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत परिचारक गटाचे नेते जिल्हा परिषद रामदास ढोणे यांच्या गटाचे ७ तर महेश साठे यांच्या गटाचे ४ सदस्य तर विरोधी गटाला उर्वरित जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजप आणि सेना अशी युती करीत सुरुवातीला भाजपला सरपंच आणि सेनेला उपसरपंच पद दिले होते. यानंतर आता सेनेला सरपंच आणि भाजपला उपसरपंच देऊन राज्यात असलेल्या महायुतीचा प्रत्यत लक्ष्मी टाकली ग्राम पंचायतीत पहावयास मिळाला आहे.

राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (eknath shinde) विराजमान होताच पहिल्याच फेरीत आषाढी एकादशीचा मान मिळाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील सेनेचा पहिला मेळावा महेशनाना साठे यांनी घेतला होता. काही दिवसातच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यावेळी पंढरपूर लगत असलेली ग्रामपंचायत महायुतीला मिळाली. आता तर थेट मुख्यमंत्री गटाला साठे बंधू यांच्या प्रयत्नाने सरपंचपद मिळाले आहे.

यामुळे पक्षातील अंतर्गत वादात न पडता आपले पक्ष वाढीचे काम करून दाखवीत थेट महेश साठे यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावून दाखविला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नजरेत अजून भक्कम स्थान निर्माण झाले आहे.

या निवडीचे वेळी माजी सरपंच विजयमाला वाळके, नागरबाई साठे, आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे, नंदकुमार वाघमारे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, रुपाली कारंडे, सागर सोनवणे हे सदस्य उपस्थित होते. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होताच जल्लोष साजरा करून सत्कार करण्यात आले.यावेळी रामदास ढोणे, महेश साठे, सचिन वाळके यांच्यासह परिचारक गट आणि साठे गटाचे अनेक समर्थक उपस्थित होते.

नगरपंचायतची वचनपूर्ती करणार : सरपंच संजय साठे

पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही सेनेतर्फे या टाकळी ग्रामपंचायतीला विविध विकास कामाबरोबरच आपल टाकळी गाव नगरपंचायत करू असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. त्याचा जलद पाठपुरावा करून लक्ष्मी टाकळी लवकरच नगरपंचायत करून दाखविणार असल्याचे नूतन सरपंच संजय साठे यांनी जाहीर केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT