Eknath Shinde-Rahul Narvekar Saam TV
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification Result: एकनाथ शिंदेंची पक्षातील हकालपट्टी मान्य करता येणार नाही; विधानसभा अध्यक्षांचे मत

Shivsena MLA Disqualification Result: या निकालाच्या वाचनादरम्यान एकनाथ शिंदेंची पक्षातील हकालपट्टी मान्य करता येणार नाही, असं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत व्यक्त केलं.

Vishal Gangurde

Shivsena MLA Disqualification Result Update:

राज्याच्या राजकारणासाठी आजचा महत्वाचा दिवस आहे. आज बुधवारी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून वाचन होत आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या निकालाच्या वाचनादरम्यान एकनाथ शिंदेंची पक्षातील हकालपट्टी मान्य करता येणार नाही, असं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं. (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल वाचला. यावेळी नार्वेकरांनी निकालातील महत्वाचे निरीक्षण नोंदवले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,'२०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही'.

'शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण शिवसेनाप्रमुख हे प्रमुखपद होते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये १९मधील १४ सदस्य हे प्रतिनिधीसभेतून निवडून येणार होते, तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत,असं मत नार्वेकरांनी व्यक्त केले.

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. पक्षात बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्यानं नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो. पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल, तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

Railway : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जाणार

SCROLL FOR NEXT