Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : १० कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं शिंदेंना मिळणार? शिंदे-फडणवीस यांच्यात तासभर चर्चा

Eknath Shinde Meet Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रविवारी मध्यरात्री तासभर चर्चा झाली. यामध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळात कोण कोण असेल, याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितेलय.

Namdeo Kumbhar

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

Eknath Shinde Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रविवारी रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर दोन नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने दोन्ही नेत्यामध्ये तासभर चर्चा झाली.

१६ ते २१ यादरम्यान अधिवेशन होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रविवारी रात्री उशीरा चर्चा झाली. यामध्ये मंत्रिमंडळात कोण कोण असेल, कोणाला कोणती खाती दिली जातील, यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर आलेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रविवारी रात्री वर्षावर बैठक झाली. तासभर दोन नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत खलबतं झाली. मिळालेल्या माहितीनुसार, १० कॅबिनेट आणि तीन राज्य मंत्रि‍पदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे मंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांना गृह, नगरविकास आणि महसूल ही महत्त्वाची खाती हवी होती. भाजपकडून गृह सोडण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले होते. आता पुन्हा एकदा खातेवाटपाच्या चर्चेने वेग धरला आहे.

राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड -

विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना आज अध्यक्षपदी स्थानापन्न केले जाणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोधपणे निवड झाली आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा सांभाळणार विधानसभा अध्यक्षपद स्विकारणार आहेत.

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरला होता. राहुल नार्वेकर मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील निर्णयावरून राहुल नार्वेकर चर्चेत आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT