Eknath Shinde announces cancellation of birthday celebrations as Maharashtra mourns Ajit Pawar’s demise. Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधानानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde Cancels Birthday Celebration After Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 9 फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना केले आहे.

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना सकाळी 9 वाजेच्या दरम्यान विमान क्रॅश झाले आणि अजित पवार यांच्यासह सहा जणांचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. यानंतर राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रात घरोघरी दु:खाचा डोंगर कोसळला.

आता यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी ही पुष्पगुच्छ आणू नयेत. तसेच शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाहीये. व्यक्तिशः मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी कधीच भरून निघणार नाही.

पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दु:खद परिस्थितिमध्ये वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू असे आवाहन शिंदे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात भूकंप! अमित शाहांना व्हायचंय उपपंतप्रधान, पण मोदींनी...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नगरच्या कांदा बाजारात कांद्याला उच्चांकी भाव

Fatty liver in women: नोकरी करणाऱ्या 3 पैकी एका महिलेला फॅटी लिव्हरचा धोका; दारू न पिता यकृतात चरबी का साठतेय? जाणून घ्या कारणं

"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

SCROLL FOR NEXT