EK NATH SHINDE CABINET RESHUFFLE AFTER DUSSEHRA | SHINDE SENA NEWS saam tv
महाराष्ट्र

शिंदेसेना मंत्रिपदाची भाकरी फिरवणार? दसऱ्यानंतर शिंदेसेनेत फेरबदलाचे संकेत

Maharashtra Politics: शिंदेसेनेतील मंत्र्यांचे धाबे पुन्हा एकदा दणाणलेत..आणि त्याला कारण ठरलयं...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाची भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिलेत... त्यामुळे शिंदेसेनेत मंत्रिपदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Suprim Maskar

दसऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेत मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय...मंत्र्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे..या काळात समाधानकारक कामगिरी न केलेल्या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय... या संभाव्य बदलांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत दिले जातायत...शिंदेसेनेत मंत्रिपदाची भाकर फिरवण्याचे संकेत स्वत: एकनाथ शिंदेंनीच काही दिवसांपूर्वी दिले होते...

जनतेची कामं, मतदारसंघातील प्रश्न आणि पक्षसंघटनेच्या वाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना शिंदेंनी आधीच तंबी दिली होती.

दुष्काळी परिस्थितीत मंत्र्यांनी जिल्ह्यांचे दौरे करणं अपेक्षित असताना अनेक मंत्री आपला मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याबदद्ल शिंदेंनी संताप व्यक्त केला होता.

त्यानंतरही कामगिरीत सुधारणा न करणाऱ्य मंत्र्यांना दसऱ्यानंतर डच्चू दिला जाऊ शकतो..

सध्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांची पदोन्नती होऊ शकते

यामध्ये प्रामुख्याने योगेश कदम आणि आशिष जयस्वाल यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय.

दरम्यान मंत्री उदय सामंतांनी स्वत: फेरबदलाचे निर्णय एकनाथ शिंदे घेतली, असं म्हणत मंत्रिपदाची भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिलेत...एका बाजूला अकार्यक्षम मंत्र्यांची कामगिरी पक्षासाठी डोकेदुखी ठरत असताना दुसऱ्या बाजूला तरुण आमदारांना संधी मिळाल्यास पक्षाला नवी ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे दसऱ्यानंतर शिंदेसेनेत होणाऱ्या या फेरबदलाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजित दिपकेंना सशर्त जामीन मंजूर, कुमारांविरोधातील आंदोलन थंडवणार की चिघळणार? तिहारमध्ये असलेल्या दास आणि रांकांचं काय होणार?

गोकुळसाठी यल्लमादेवीची शपथ, देवीचा धाक दाखवून मिळणार सत्ता? मंत्र्यांनी मोडला अंधश्रद्धा निर्मुलन कायदा?

पवारांना काँग्रेसची साथ, ठाकरेसेना नाराज? शिंदेसेना-राष्ट्रवादीत समेट, शिंदेसेनेतच फाटफूट

IMD Alert: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह १० राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

SCROLL FOR NEXT