Eknath Shinde banner
Eknath Shinde banner saam tv
महाराष्ट्र

'लोकांचा नाथ एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ', शिंदे समर्थकांचे बॅनर झळकले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातील राजकारणात बंडाचं बीज पेरलं आहे. शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० आमदारांनी बंड पुकारल्यानं शिवसेनेत राजकीय मैदानात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय समीकरणं बदलत असतानाच शिवसेनेतील बंडाचा पेच घट्ट होत आहे. तर दुसरीकडे ठाणे, कल्याण- डोंबिवलीतील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक (Eknath Shinde banners) बॅनर झळकवत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी शिंदे समर्थकांनी बॅनरबाजी केलीय.

लोकांचा नाथ एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ, अशा आशयाचे बॅनर शिंदे समर्थकांनी लावले आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची (Anand Dighe) शिकवण पुढे घेवून जाणारे एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा, असं या बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांमध्ये भर पडत असल्याचे चित्र दिसून येतंय .कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व असून एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या गोटात शांतता असली, तरी आज शिंदे समर्थकांकडून डोंबिवली शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली . कल्याणमध्ये देखील भगवे बॅनर लावण्यात आले आहेत .कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व परिसरात हे बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलंय.त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ पदाधिकारी व शिवसैनिक देखील शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरल्याचे सध्या दिसून येतंय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

SCROLL FOR NEXT