Deputy CM Eknath Shinde announcing the revised Abhay Scheme offering relief to 20,000 unauthorized buildings in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

Mumbai Gets Major Gift from Winter Session: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलंय... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणती योजना जाहीर केलीय... आणि या योजनेचा किती लाख मुंबईकरांना फायदा होणार ?

Bharat Mohalkar

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील 20 हजार अनधिकृत इमारतींना अभय देण्यासाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय... त्याचा तब्बल 10 लाख मुंबईकरांना फायदा होण्याची शक्यता आहे..

खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील 20 हजार अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना दुप्पट मालमत्ता कर आणि पाणीपट्टी, मलनिःस्सारण कर भरावा लागत होता... एवढंच नाही तर पुनर्विकासासाठी बँकेकडून कर्जही मिळत नव्हतं...मात्र आता सरकारने थेट पागडी इमारतींचा पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावलीच नाही तर ओसी नसलेल्या इमारतींनाही अभय दिलंय... मात्र या अभय योजनेमुळे काय फायदे होणार आहेत..

या अभय योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत?

१० लाखांहून अधिक मुंबईकरांना आर्थिक भुर्दंडापासून मुक्ती.

घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ

पुनर्विकासाला चालना आणि नागरिकांना संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येणार

कायदेशीर कारवाईची टांगती तलवार दूर

रेडीरेकनरच्या दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार

महापालिका निवडणूक येत्या 4 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे... त्याच्या आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभय योजना जाहीर केलीय. ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेसेनेची कोंडी झाली होती. त्या पार्श्वभूमिवर मुंबईत या योजनेचा शिंदे सेनेला राजकीय लाभ मिळणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

SCROLL FOR NEXT