Eknath Khadse Saam Tv
महाराष्ट्र

Explainer : एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश भाजपसाठी किती महत्वाचा? वाचा स्पेशल रिपोर्ट

Eknath Khadse Met Amit Shah: लोकसभेची निवडणुक झाल्यानंतरही एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. यातच एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. आता लवकरच त्यांनी घरवापसी होईल, अशी चर्चा आहे.

Pramod Subhash Jagtap

एकेकाळी राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्याच एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडाव लागलं होतं. तेंव्हापासून एकनाथ खडसे जरी भाजपमध्ये असले तरी त्यांचा पक्षातील वावर असून नसल्यासारखाच होता. अखेर कोरोनानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच घड्याळ बांधल.

पुढं भाजपवर आणि त्यातही प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर टिका करणारी विरोधी पक्षातील पहिली व्यक्ती म्हणजे एकनाथ खडसे. याच एकनाथ खडसेंना शरद पवारांनी पुढे विधानपरिषदेची आमदारकी दिली आणि रावेर लोकसभा निवडणुकीची तयारीही करायच्या सुचना दिल्या होत्या. मात्र रावेर लोकसभा लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसेंना भाजपकडून तिकीट जाहीर झाल्याने खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. सोबतच रक्षा खडसे यांच्यासाठी काम करणार असल्याचं म्हणत पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तेंव्हापासून खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र लोकसभेची निवडणुक झाल्यानंतरही खडसेंचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. आता तो लवकरच होईल, असं बोललं जातंय आणि त्यासाठी कारण समोर आलंय ते म्हणजे एकनाथ खडसे यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट.

शहांच्या भेटीनंतर लवकरच प्रवेश होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला जी मंत्रिपद मिळालीत, त्यात एक मंत्रिपद मिळाले ते रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना. रक्षा खडसे यांच्याकडे केंद्रीय क्रीडा राज्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. रक्षा यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रक्षा यांच्या भेटीवेळी त्यांच्यासोबत एकनाथ खडसे हेही उपस्थित होते.

एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चाही झाली. एकनाथ खडसे हे पुर्वी भाजपमध्ये असताना त्यांनी अमित शहाणा यांची अनेक वेळा भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून दोघांची भेट झाली नव्हती. या भेटीत खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खडसे भाजपवासी होऊ शकतात, अशी माहिती आहे. माझा पक्षप्रवेश दिल्लीत होईल, असं खुद्द एकनाथ खडसे यांनी याआधीच सांगितलं आहे. त्यामुळं खडसेंचा प्रवेश अमित शहा यांच्या हस्ते होणार का? याची उत्सुकता लागलीय..

खडसेंची उपयुक्तता वाढलीय का ?

एकनाथ खडसे हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते आहेत. ज्यावेळी राज्यात भाजपची परिस्थिती चांगली नव्हती, तेंव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यासोबत एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत राज्यात भाजप वाढवली होती. एकनाथ खडसेंकडे राज्यातील मोठा ओबीसी नेता म्हणूनही पाहिलं जातं. सोबतच उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचं मोठ कार्यकर्त्यांचं जाळं आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात खूप मोठा फटका बसलाय. 28 जागा लढणाऱ्या भाजपला राज्यात फक्त 9 जागांवर विजय मिळवता आलाय.

सध्या जरी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले तरी उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ज्या दोन जागा निवडून आल्यात, त्या दोन्हीही जागा या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मागच्या अनेक दशकांपासून एकनाथ खडसे यांच वर्चस्व असल्याचं पहायला मिळालं. त्याचीच पुनरावृत्ती याही निकालात आलीय त्यामुळं एकनाथ खडसे यांच महत्त्व पुन्हा एकदा अधोरिखीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

SCROLL FOR NEXT