Sangali : सांगलीच्या बाजारात वांगी झाली चिकनपेक्षा महाग SaamTV
महाराष्ट्र

Sangali : सांगलीच्या बाजारात वांगी झाली चिकनपेक्षा महाग

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : अवकाळी पावसाने वांगी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने बाजारातील आवक घटली आहे. त्यामुळे सांगलीच्या (Sangali Market) बाजारात चिकनपेक्षा वांगी महाग अशी स्थिती झाली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या काटेरी कुडची वांग्याचा दर 160 रुपये किलो, तर चिकनचा (Chicken) दर दीडशे रुपये किलो आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले असून वांग्याचीं फूल गळती झाली आहे. तसेच वांग्यावर किडीचाही मोठा प्रादुर्भाव झाल्याने वांग्याची आवक कमालीची घटली आहे. यामुळे बाजारात वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाराशे ते तेराशे रुपये दहा किलो दर उत्पादकांना मिळत असून किरकोळ बाजारात चाळीस रुपये पाव किलो या दराने वांग्याची विक्री  केली जात आहे. टोमॅटोचा दर मात्र उतरला आहे. ऐंशी ते शंभर रुपये किलोवर गेलेला टोमॅटोचा दर चाळीस रुपयापर्यंत खाली आला आहे.

हे देखील पहा -

अन्य भाज्यांचे प्रति किलोचे दर पुढील  प्रमाणे गवार शंभर रुपये, भेंडी ८० रु., घेवडा, पावटा 60 ते 80, दोडका, 60 रूपये, ढबू मिरची 40 रूपये असे दर आहेत. मेथीचा जुडीचा दर 20 रूपये, तर कांदा पात, तांदळ, पालक, शेपू, लाल माट या भाजीची जुडी 15 रूपये तर करडा 10 रूपये असे दर बाजारात आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health Update: मनोज जारांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील साखरेचे प्रमाण झालं कमी, चालत ही येईना

Maharashtra News Live Updates : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी आपसात भिडले

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

SCROLL FOR NEXT