Nashik News: नाशिकमध्ये अंड्याच्या दरात तब्बल ५० टक्के वाढ झाल्याने अंडी महागली आहे. अंड्यांचे दर आभाळाला भिडल्याने सर्वसामान्यांनच्या खिशाला कात्री बसली आहे. होलसेल बाजारात ४५० रुपये शेकडा विकली जाणारी अंडी आता प्रति शेकडा ५५० रुपयांवर जावून पोहचली आहे. किरकोळ बाजारात साडेचार ते ५ रुपयांना मिळणारं अंड आता ६ ते ७ रुपयांना मिळत आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, एरवी उन्हाळयात मागणी नसल्यानं अंड्याचे भाव ३ ते ४ रुपयांपर्यंत स्थिर राहतात. मात्र यंदा अंड्याच्या (Egg) दरात मोठी वाढ झाल्याने अंडी प्रेमींच्या खिशाला याची झळ बसत आहे.
श्रीलंका, पाकिस्तानसह बांगलादेशमध्ये अंड्यांची निर्यात वाढली आहे. तर दुसरीकडे पोल्ट्री फार्मचा खर्च वाढल्याने जिल्ह्यातील पोल्ट्रीची घटती संख्या याचा परिणाम अंड्यांच्या दरावर झाला आहे.
जिल्ह्यात तीन वर्षांच्या तुलनेत आता ४० टक्क्यांनी ही संख्या कमी झाली आहे. पोल्ट्री चालवण्याचा खर्च, खाद्याचा दर, इंधन दरवाद अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. त्यामुळे मागणीत वाढ आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे.
एकट्या नाशिक (Nashik) शहरात दररोज ५ लाख अंड्यांची मागणी असते, मात्र सध्या अवघे ३ लाख अंड्यांचा पुरवठा होत असल्यानं अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या काळात अंड्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेत निर्यात वाढल्यामुळे अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. एकीकडे बाजारात मागणी वाढलेली आहे. तर दुसरीकडे बाजारात पोल्ट्रीफार्म बंद पडल्याने अंड्यांची आवक घटली आहे. लोकांकडून मागणी वाढली तर पुरवठा कमी होत आहे. त्याचा परिणाम अंड्यांच्या दरावर होत आहे.
यामुळे होलसेल बाजारात ४५० रुपये शेकडा विकली जाणारी अंडी आता प्रति शेकडा ५५० रुपयांवर जावून पोहचली आहे. पुरवठ्यावर असाच परिणाम राहिला तर येत्या काळात अंड्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.