Pandharpur Chandan Uti Puja: चंदनउटी पूजेतून विठ्ठल मंदिर समितीला ३५ लाखांचे उत्पन्न; ८५ किलो चंदनाचा वापर

चंदनउटी पूजेतून विठ्ठल मंदिर समितीला ३५ लाखांचे उत्पन्न; ८५ किलो चंदनाचा वापर
Pandharpur Chandan Uti Puja
Pandharpur Chandan Uti PujaSaam tv
Published On

पंढरपूर : उन्हाच्या तीव्र उष्णतेपासून देवाचे संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा या श्रध्देपोटी दरवर्षी गुढीपाडवा ते मृग नक्षत्र या (Vitthal Rukhmini Temple) दरम्यान विठ्ठल रुक्मिणीची चंदनउटी पूजा केली जाते. या अडीच महिन्‍याच्‍या काळात चंदनउटी पूजेतून मंदिर समितीला ३५ लाख रूपयांचे (Pandharpur) उत्‍पन्‍न मिळाले आहे. (Maharashtra News)

Pandharpur Chandan Uti Puja
Eknath Shinde Banner: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना– भाजपमध्ये धुसफुस; स्‍वागत बॅनरमधून देवेंद्र फडणवीस यांना वगळले

पंढरपूरात विठ्ठल– रूक्‍मीणी चंदन उटी पूजा ही काही दिवस अगोदर भाविकांकडून बुकिंग केल्या जातात. त्यानुसार दररोज एक किंवा दोन भाविकांच्या हस्ते चंदन उटी पूजा केली जाते. विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी २१ हजार तर रूक्मिणी मातेच्या पूजेसाठी ९ हजार रूपये देणगी मूल्य आकारण्यात येते. यावर्षी चंदन उटी पूजेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. चंदन उटी पूजेची गुढीपाडव्याच्या दिवशी सुरवात होते. तर मृग नक्षत्राच्या सुरवातीला पूजेची सांगता होती. त्यानुसार आज चंदन उटी पूजेची सायंकाळी चार वाजता सांगता होणार आहे. आषाढी यात्रा तोंडावर आली आहे. यात्रेसाठी मंदिर समितीकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Pandharpur Chandan Uti Puja
Dhule News: दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पाडला बंद; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

८५ किलो चंदनाचा वापर

२२ मार्च ते ७ जून या काळातील चंदन उटी पूजेच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर समितीला ३५ लाख ७३ हजार रूपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. या काळात देवाच्या चंदन उटीपूजेसाठी तब्बल ८५ किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे. शुद्ध असलेले हे चंदन खास म्हैसूर येथून आणण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com