अभिजित देशमुख
कल्याण : ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये धुसफुस असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दिवा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्वागतासाठी (Shiv Sena) शिवसेनेकडून लावण्यात येणाऱ्या बॅनर्समध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना स्थान देण्यात आलेले नाही. (Live marathi News)
आज दिवा येथे होणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवा येथे येणार आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी दिवाच नव्हे तर डोंबिवली शहरात देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमध्ये (BJP) भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मात्र स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे हा कार्यक्रम दिव्यात आहे. दिव्यातील पदाधिकाऱ्यांचे बॅनर डोंबिवलीत झळकल्याने चर्चा सुरू असतानाच या बॅनरवरून शिवसेना भाजपमध्ये धुसफूस असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
निमंत्रण दिले तरी भाजपवाले येत नाहीत
देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याबाबत शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी हा कार्यक्रम ठाणे महापालिकेचा आहे. महापालिका त्यांचे बॅनर लावेल. मी जे बॅनर लावलेत ते शिवसेनेचे लावलेत. दिव्यात शिवसेनेचे भाजपासोबत किती सख्य आहे हे सगळ्यांना माहीत आहे. विरोध करणारी भाजपही किती ही निमंत्रण दिले तरी येणार नाही. मग बॅनरवर तरी यांचे फोटो कशाला टाकायचे असे सांगितले. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये सारे काही अलबेल असल्याचे चित्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून निर्माण केले जात असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मात्र शिवसेना भाजपातील धुसफूस दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.