Oil Inflation  Saam Tv
महाराष्ट्र

Oil Inflation : दिवाळीच्या सणाला महागाईच्या झळा, खाद्यतेल महागलं; प्रतिकिलो मागे २० रूपयांची वाढ

Edible Oil Becomes More Expensive In Festive Season Diwali : ऐन सणासुदीच्या काळातच खाद्यतेल महागलं आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईच्या झळा बसताना दिसत आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीचे वेध लागलेत. या सणासुदीच्या काळामध्ये खरेदीला मोठं उधाण येतंय. मात्र देशात मागील ४ दिवसांपासून महागाईने थैमान घालण्यास सुरुवात केलीय. दिवाळी तोंडावर आली असतानाच खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झालीय, त्यामुळे आता मध्यमवर्गीयांना फटका बसताना दिसत आहे.

गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. परंतु केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये ३० टक्के वाढ केल्यामुळे एक किलो तेलामागे २० रुपये वाढ (Edible Oil) झालीय. त्यामुळे तेलाच्या किमती प्रचंड भडकल्या आहेत. आपण खाद्यतेलाच्या किमतीत नक्की किती वाढ झालीय, हे जाणून घेवू या.

सामान्यांना महागाईच्या झळा बसणार

जागतिक बाजारपेठेच्या तुलनेमध्ये देशात यंदा खाद्यतेलाचे भाव वाढले (Edible Oil Price) आहेत. मागील वर्षी खाद्यतेलाच्या १५ लिटरच्या एका डब्याची किंमत एक हजार ६५० रुपये होती. यंदा त्यात ५०० रुपये वाढ झाल्यामुळे तोच डबा आता दोन हजार ५० रुपयांना मिळत आहे. तर एक किलो खाद्यतेलाचा भाव ११८ रुपयांवरून १३८ रुपयांवर गेलाय. प्रतिलिटर तेलामागे सुमारे २० रुपये भाववाढ झालीय. यामुळे यंदाची दिवाळीच्या सणात सामान्यांना महागाईच्या झळा बसणार असल्याचं चित्र आहे.

सध्या काय आहेत तेलाचे दर?

सूर्यफूल तेलाचे सध्याचे दर १३८ रूपये आहे, याआधी ते ११८ रूपये प्रतिकिलो होते. सोयाबीन तेलाचे सध्याचे दर १२४ रूपये आहे, याआधी ते १०७ रूपये प्रतिकिलो होते. पामतेलाचे सध्याचे दर १२० रूपये (Edible Oil Price In Diwali) आहे, याआधी ते १०५ रूपये प्रतिकिलो होते. शेंगदाणा तेलाचे सध्याचे दर १६० रूपये आहे, याआधी ते १७० रूपये प्रतिकिलो होते.

तेलाच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ (oil inflation) झालीय. मागील दिवाळीत खाद्यतेल स्वस्त होते, परंतु यंदा मोठी वाढ झालीय. त्यामुळे दिवाळीत गृहिणींना खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेलकट पदार्थ कमी तळावे लागणार असल्याचं दिसतंय, अशी प्रतिक्रिया मार्केटयार्डचे खाद्यतेल व्यापारी राजकुमार नहार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT