Edible Oil Price : सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका! खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

Edible Oil Latest Price : महागाईने पिचलेल्या जनतेला पुन्हा एकदा झटका मिळणार आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होणार आहे. देशभरात खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले आहेत.
Edible Oil Price, Edible Oil Latest Price
Edible Oil Price, Edible Oil Latest PriceSaam TV
Published On

Edible Oil Price Hike :

महागाईने पिचलेल्या जनतेला पुन्हा एकदा झटका मिळणार आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होणार आहे. देशभरात खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले आहेत.

तेलाच्या दरात प्रतिकिलो १०ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. आयातशुल्क कमी केले असले तरीही दरवाढ कायम आहेत. मार्चपर्यंत दरवाढ लागू राहाण्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा गृहिणीचे बजेट कोलमडणार आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने निवडणुकांपूर्वी कच्चा तेलाच्या किमतीत २ रुपयांनी (Price) कपात केली होती. यापूर्वी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याने वापरकर्त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Edible Oil Price, Edible Oil Latest Price
Petrol Diesel Rate (20th March 2024): पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल,जाणून घ्या राज्यातील आजचे दर

लवकरच लग्नसराई आणि सणासुदीचे काळ सुरु होतील. अशातच या काळात तेलाचे आणि चमचमीत पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात. दरवाढीमुळे पुन्हा एकदा गृहिणींना टेन्शन येणार आहे.

भारत (India) हा जगातील खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदर आहे. ६०% गरजा आयातीद्वारे पूर्ण करते. भारतात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल खरेदी केले जाते. तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेल (Oil) आयात करतो.

Edible Oil Price, Edible Oil Latest Price
Jaya Kishori : खरा मित्र कसा ओळखाल? जाणून घ्या जया किशोरींकडून

सूर्यफूल बियाणे तेल आणि आरबीडी पाम मार्च 2025 पर्यंत कमी दराने आयात केले जाऊ शकतात. सोयाबीन तेल, खाद्य ग्रेड आणि क्रूड पाम तेल केवळ 31 मार्च 2024 पर्यंत सूट मिळू शकते अशी माहिती मिळाली होती. निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारकडून गृहिणींना दिलासा मिळेल का हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com