ED raids NCP leader Hasan Mushrif's house Saam Tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळी ६ वाजता मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

ED Raids Hasan Mushrif's House : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी ६ वाजता मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती आहे. अचानक छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ज्यावेळी ईडीने ही छापेमारी केली तेव्हा हसन मुश्रीफ हे घरी नव्हते. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने आयकर विभागासह छापेमारी केल्याचं समजताच परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. दुसरीकडे ईडीने मात्र, परिसर सील केला असून आपली छापेमारी सुरू ठेवली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बँगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

SCROLL FOR NEXT