Nawab Malik, ED Raid in Nashik,
Nawab Malik, ED Raid in Nashik,  Saam TV
महाराष्ट्र

नाशिक: नवाब मलिक प्रकरणी ईडीकडून भंगार व्यावसायिकांची कसून चौकशी! (पहा Video)

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिकः राज्य सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये (Nashik) धडक मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथे काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली आहे. (ED Raid in Nashik)

या प्रकरणी माहिती द्यायला पोलीस आणि प्रशासनाने मात्र नकार दिला आहे. ईडीने आज गुरुवारी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सकाळी छापे मारले आणि त्यांना अटक केली. यावरून नाना पटोलेंसह महाविकास आघाडीतील इतर नेते आणि मंत्री आक्रमक झालेले दिसून आले.

चौकशी कुठे केली?

नाशिकमधील अंबड (Ambad) परिसरात काही भंगार व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या ठिकाणी ईडीने (ED) अचानक धडक दिली आणि तेथे जाऊन अनेक व्यापाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यापाऱ्यातील अनेकांचा थेट नवाब मलिक यांच्याशी संबंध होता असे म्हणले जात आहे. त्यांच्याशी यांचे व्यवहार सुरू होते, त्यामुळे ईडीने येथे येऊन झाडाझडती घेतल्याचे माहिती मिळत आहे. याप्रकरणी अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात किंवा अटक केल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

पहा व्हिडीओ-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

SCROLL FOR NEXT