CJP FOREIGN FUNDING UNDER ED SCANNER? MAHARASHTRA MINISTER SAYS INVESTIGATION UNDERWAY 
महाराष्ट्र

कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढणार? विदेशी फंडिंग ईडीकडून चौकशी सुरू, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

ED investigation into CJP Foreign funding : 'कॉक्रोच जनता पार्टी'ला आता तपास यंत्रणांच्या तपासाचा सामना करावा लागत आहे; कारण संबंधित अधिकारी पक्षाला मिळालेला कथित विदेशी निधी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत.

Bharat Jadhav

  • तपासात बँक खाती आणि परदेशातून मिळालेल्या देणग्यांचाही समावेश

  • नीट आंदोलनानंतर सीजेपी पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी

  • या चौकशीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता

कॉक्रोच जनता पार्टीनं नीट पेपरफुटी प्रकरणविरोधात दिल्लीत आंदोलन उभे करून सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला. प्रधान यांच्या राजीनामा घेण्यास भाग पाडणारी 'कॉक्रोच जनता पार्टी' आता सरकारच्या रडारवर आली आहे. या आंदोलनाची आणि त्यात 'जेन झी' तरुणाईने घेतलेल्या सक्रिय सहभागाची जगभरात चर्चा झाली. मात्र, या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीला मिळणाऱ्या विदेशी देणग्यांची आता सखोल चौकशी सुरू करण्यात आलीय, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

राज्य सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. यामुळे नवा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत."सीजेपीसह राज्यातील इतर काही संस्थांना मिळणाऱ्या परदेशी देणग्यांची चौकशी सुरू झालीय. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि केंद्रात 'ईडी'कडून ही सखोल तपासणी केली जात आहे. या संस्थांचे बँक खाती आणि आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत.

कठोर कारवाईचा इशारा

"कायदेशीर मार्गाने परदेशातून देणगी मिळवणे यात काहीही गैर नाही. परंतु, जर या पैशांचा वापर देशात मुद्दाम अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्यासाठी किंवा चुकीच्या कामांसाठी केला जात असेल, तर संबंधितांवर निश्चितच कठोर कारवाई होईल," असा रोखठोक इशाराही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलाय.

आपल्या देशात लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे किंवा निषेध नोंदवणे हे चुकीचं नाही. मात्र सीजेपी असोके अन्या काही संघटना आहे. त्या चुकीच्या पद्धतीने फॉरेन फंडीग घेऊन चुकीच्या कामाकरता उपयोग केला असेल तर याची चौकशी केली जाईल. याची तपासणी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील एका संस्थेला फॉरेन फंडिंग आल होतं. काही तक्रारी प्राप्त झाल्या त्या नंतर तपासणी ते फंडिंगचा वापर चुकीच्या कामाकरिता करण्यात आल्याचं समोर आले. त्यानंतर कारवाई करण्यात आली. अशाच पद्धतीने चुकीचे काम फॉरेनर फंडिंच वापर करण्यासाठी होणार असेल तर त्याची चौकशी केली जाणार आहे.

कारवाईच्या इशाऱ्यानंतर काय म्हणाले अभिजीत दीपके?

सरकारने चौकशीचा ससेमिरा मागे लावल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही सरकारवर जोरदार पलटवार केला. तपास यंत्रणांच्या या चौकशीवर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी थेट यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवले आहेत. "जर आम्हाला खरोखरच परदेशातून देणग्या मिळत असतील आणि त्याचा या देशात चुकीचा वापर केला जात असेल, तर हे थेट गृहमंत्रालयाचेच सर्वात मोठे अपयश आहे." अभिजीत दीपके यांच्या या विधानामुळे आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT