महाराष्ट्र

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Sahara India Scam update : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई केलीये. ईडीच्या कारवाईने सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Vishal Gangurde

ईडीने सहारा इंडिया आणि सुब्रतो रॉय यांच्यावर ₹1.74 लाख कोटी घोटाळ्याचा आरोप करत चार्जशीट दाखल

सहारा समूहाने गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे केले गोळा

आरोपींमध्ये सुब्रतो रॉय यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश

गाझियाबाद, लखनौ, श्रीगंगानगर आणि मुंबईसह देशभरात ९ ठिकाणी ईडीने छापेमारी

नवी दिल्ली : ईडीने सहारा इंडियाविरोधात कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. ईडीने सहारा इंडियाविरोधात पुन्हा एकदा कारवाई सुरु केली आहे. ईडीने सहारा इंडिया, सुब्रतो रॉय कुटुंब आणि कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत चार्जशीट दाखल केली आहे. ईडीने चार्जशीट कोलकोताच्या पीएमएलए कोर्टात दाखल केले. ईडीने सहारा इंडियावर १ लाख ७४ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केला आहे.

चार्जशीटमध्ये आरोपात चांगला परतावा देण्याचं आमिष देऊन लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले. मात्र, त्यांनी लोकांना पैसे परत दिले नाहीत. या चार्जशीटमध्ये सुब्रतो रॉय यांची पत्नी सपना, मुलगा सुशांतो रॉय आणि जेपी वर्मा, अनिल अब्राहम आणि अन्य आरोपींचा समावेश आहे.

ईडीच्या माहितीनुसार, सुब्रतो रॉय यांचा मुलगा फरार आहे. त्याची चौकशी झालेली नाही. ईडीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. सुब्रतो रॉय सहारा यांचं २००३ मध्ये वयाच्या ७५ वर्षी मृत्यू झाला.

मागील महिन्यात सहारा समूहाशी संबंधित ईडीने अनेक राज्यात छापेमारी केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद, लखनौ, राजस्थानच्या श्रीगंगानगर आणि मुंबई येथील एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ईडीने कोर्टाच्या परवानगीनंतर छापेमारी करण्यात आली.

सहाराने छोट्या छोट्या गावात 'एजेंट नेटवर्क' उभं केलं. एजेंटने गावागावातील लोकांना विश्वासात घेऊन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचं आश्वासन केलं. गरीब आणि मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात एजेंटच्या भूलथापांना बळी पडले. कोणी मुलीच्या लग्नासाठी, तर कोणी घर तयार करण्यासाठी आणि कोणी वृद्धापकाळासाठी साठवलेली जमापूंजी सहारा समूहात गुंतवणूक केली. कंपनीत हळूहळू गुंतवणुकीची रक्कम कोटींच्या घरात पोहोचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी आता मिशन सेव्ह तपोवन

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

Crime: बाप बनला हैवान! झोपलेल्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, नंतर बायकोवर चाकू हल्ला; मुंबई हादरली

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचा 'वेगळा' निर्णय

SCROLL FOR NEXT