Vijaykumar Gavit News Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit Speech : भाजप नेते विजयकुमार गावितांचा अजब दावा; ऐश्वर्या रायचा उल्लेख करत म्हणाले...

Political News : मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात.

साम टिव्ही ब्युरो

Dhule News : राजकीय नेते सभेत अनेक किस्से सांगून उपस्थितांची वाहवा मिळवताना दिसतात. मात्र काही वेळा सभा गाजवण्याच्या नादात नेते असं काही बोलून जातात की त्याचे पडसाद उमटू लागतात.

भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विजयकुमार गावित यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या राय सारखे होतात असा अजब दावा विजयकुमार गावित यांनी केला आहे. धुळ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात मासे खाण्याचे फायदे सांगताना म्हटलं की, ऐश्वर्या रायला बघितलं का? नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले. ती समुद्र किनारी राहणारी आहे. त्यामळे ती दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना कसे झाले? मासे खाल्ले तर तुमचेही डोळे तसेच होणार, असं विजयकुमार गावित यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

यापुढे ते असंही म्हणाले की, मासे खाण्याचा आणखी एक फायदा आहे. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते. कुणीही बघितलं तर लगेच पटणार, असं गावितांनी म्हटलं. विजयकुमार गावित यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Political News)

कोण आहेत विजयकुमार गावित?

विजयकुमार गावित भाजप नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी आहे. याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तिथे असतानाही त्यांनी विविध मंत्रीपदं भूषवलेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT