Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP) दोन गट पडल्यानंतर एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली.
राज्यात कधीही शरद पवारांना एकहाती सत्ता मिळवता आली नसल्याचे विधान त्यांनी केले. वळसे पाटलांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाडांनी या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra Politics)
वळसे पाटलांची टीका...
याबाबत अधिक माहिती अशी की, एका कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी "शरद पवार (Sharad Pawar) हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही.. अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
"दिलीप वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस. प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही? याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे.. असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले. बरे झाले साहेबांविषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही.. असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.