earthquake tremors in nagpur city since 3 days Saam Digital
महाराष्ट्र

नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद, अफवांवर विश्वास ठेवू नका : भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

Nagpur Earthquake Marathi News : नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये विशेषत: भूंकपाच्या धक्क्यांबाबत असे आवाहन भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केले आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. दरम्यान भारतीय भु वैज्ञानिक सर्वेक्षण यानी हे धक्के सौम्य असल्याचे सांगून याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूगर्भ विभागाचे राजेश जोशी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले नागपूर मध्ये जाणवलेले धक्के हे 2.5 च्या जवळच्या रिश्टर स्केल मधील आहे. याचा भूगर्भात कुठलाही परिणाम होणार नाही. साधारणत: 4.5 रिश्टर स्केल मधील भुकंप झाल्यास त्याचा परिणाम होताे असे जोशींनी स्पष्ट केले.

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पारशिवणी उमरेड आणि आमगाव देवळी भिवगड दरम्यान भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. हे धक्के साैम्य हाेते. नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये विशेषत: भूंकपाच्या असे आवाहन भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार शहरात आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

FIFA World Cup 2026 : ४८ संघ, १६ शहरं आणि १०४ सामने...कोण ठरणार विश्वविजेता? चक्रावून टाकणारा अंदाज

Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

Cancer Risk: उशिरा गर्भधारणा केल्याने वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपाय

SCROLL FOR NEXT