Earthquake in Nanded, Hingoli Parbhani Saam TV
महाराष्ट्र

Earthquake in Maharashtra : नांदेड, हिंगोली, परभणीत पहाटे भूकंपाचे धक्के, घाबरलेल्या नागरिकांची धावपळ

Earthquake in Nanded, Hingoli Parbhani : परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे धक्के जाणवले.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Earthquake :

नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. गुरुवार सकाळी सव्वासहाच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रत ४.२ एवढी मोजली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्हातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हात जाणवले असून प्रशासनाकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Maharashtra News)

भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रता जास्त असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक देखील घराबाहेर पडले.

नांदेड शहरासह अर्धापूर , भोकर , हदगाव , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. काही गावातील घरांच्या भिंतींना देखील तडे गेले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी, वसमत, औंढा यासह हिंगोली तालुक्यांतील 200 पेक्षा अधिक गावांना या भूकंपाच्या धक्क्याने हादरे बसले. या भूकंपामुळे अद्याप कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.

अरुणाचल प्रदेशमध्येही भूकंपाचे धक्के

अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंगमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT