Earthquake  Saam Tv News
महाराष्ट्र

Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरलं, साखर झोपेत असताना १५ गावात जोरदार धक्के

Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात पहाटे 5.55 वाजता 3.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. औंढा व कळमनुरी तालुक्यातील 15 पेक्षा अधिक गावांना हादरे बसले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Hingoli earthquake today morning news : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. पहाटे सर्वजण साखरझोपेत असताना हिंगोलीच्या औंढा व कळमनुरी तालुक्यातील 15 पेक्षा अधिक गावात हादरे बसले. भूकंपाची तीव्रता 3.5 रेश्टर स्केल इतकी नोंदण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक झोपेत असताना भूकंप झाल्याने १५ तालुक्यात एकच धावपळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. काही सेकंदासाठी जमीन हादरली पण त्यामुळे एकच खळबळ उडाली. भूकंपाच्या धक्या नंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.नागरिकांनी भूकंपाच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

मंगळवारी सकाळी पाच वाजून 55 मिनिटांनी हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील माळधामणी गावात सुरेश बांगर यांच्या दुकानापुढे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूकंपाचे दृश्य कैद झाले आहे. या आधी देखील पिंपळदरी पांगरा शिंदे ,बोल्डा, रामेश्वर, आमदारी या गावातील परिसराला भूकंपाचे हादरे बसले आहेत. आज सकाळी झालेल्या या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर नोंद करण्यात आली. 3.5 रिस्टर स्केअर एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मागील पाच वर्षापासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत कधी सकाळी दुपारी तर कधी संध्याकाळी हे भूकंपाचे हादरे नागरिकांना बसत आहेत. मात्र अनेक वेळा या धक्क्याची तीव्रता कमी जास्त असल्याने नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह केंद्र शासनाच्या पथकाने देखील या परिसरात येऊन पाहणी केली आहे. त्यांनी देखील या भूकंपाच्या धक्क्यांना गांभीर्याने घेण्याची सुतोवाच केले. नागरिकांनी योग्य की काळजी घेण्याची आवाहन केले आहे. वापटी, कूपटी, खांबाळा, खापरखेड़ा ,शिरली, राजवाड़ी, बोलड़ा, आमदरी ,राजदरी, पिंपळदरी जामगव्हाण नांदापूर व इतर गावांमध्ये या आधी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT