Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेवर मोठं विधान केलं आहे. 'जुनी पेन्शन योजना आम्हीच देऊ शकतो. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केला, पण तो सोडवण्याची धमक आमच्यात आहे, असं विधान उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागपुरातील एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आश्वासन दिलं आहे. (Latest Marathi News)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'गेली वर्षे ही जागा शिक्षक परिषद वाढवत आहे. भाजप त्याला समर्थन देते. यावर्षी सुद्धा आपण त्यांना समर्थन दिलं. नागो गाणार १२ वर्ष आमदार आहेत. त्यांच्यात काडीचाही बदल झाला नाही. ते जमीनीवरच आहे ते महत्वाचं आहे. काही लोक आमदार होताच त्यांचं विमान हवेत उडते'.
'काही संस्था चालक गाणार यांच्यावर नाराज होतात, मात्र ते कधी वैमनस्यातून त्याकडे बघत नाही. तर ते शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढतात. कायम विना अनुदानित शाळांचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीने निर्माण केला होता. आम्ही आश्वासन दिलं नव्हतं, पण आम्ही ते काम करून दाखवलं, असे फडणवीस पुढे म्हणाले.
'येत्या काळात आपण अनुदानाचे सगळे ठरलेले टप्पे पूर्ण करणार आहे. मागील सरकारने शिक्षकांच्या बाजूने कुठलेही निर्णय घेतले नाही. आम्ही शिक्षक भरती सुरू केली. काही लोकांनी अफवा उडविल्या की, पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार पण आम्ही शाळा बंद करणार नाही, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली.
जुन्या पेन्शन योजेनवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची मला लाज वाटते, ते जणू दाखवतात जुनी योजना भाजपने बंद केली, पण तसं नाही आहे. पेन्शन खर्च वाढणार असल्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असं मी सांगितलं'.
'काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठरविले मात्र दिले नाही. जुन्या पेन्शनचा (Old Pension Scheme) वाद असो की कुठलाही तो प्रश्न सोडविण्याची ताकत फक्त आपल्यात आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.