Dussehra Melava 2025: Will Raj and Uddhav Thackeray blow the alliance bugle together? saam tv
महाराष्ट्र

Dussehra Melava: दसरा मेळाव्याला युतीचं रणशिंग फुंकणार? राज- उद्धव पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार?

Thackeray Brothers Reunion Speculation: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू युतीचं रणशिंग फुंकणार ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मात्र दसरा मेळाव्यात राज ठाकरे खरचं उपस्थित राहणार का? ठाकरेंच्या युतीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू.

  • राज ठाकरे उपस्थित राहतील का यावर उत्सुकता.

  • युती झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल.

ठाकरेसेनेचे आमदार सचिन आहीर यांच्या याचं विधानामुळे दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा रंगली असतानाच. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही दसऱ्या मेळाव्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आलायं.या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरलाच राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावलीय. त्यामुळ चर्चेला अधिकच जोर चढलाय..या दसरा मेळाव्यात नेमकं काय होऊ शकतं पाहूयात.

मनसे दसरा मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यातून ठाकरे बंधू युतीची घोषणा करू शकतात..तसंच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसंदर्भातील भूमिकाही स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

2005 नंतर ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र व्यासपीठावर आलेले नाहीत. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू दसरा मेळाव्यातही एकाच व्यासपीठावर दिसले तर युतीची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र ठाकरेंच्या युतीची घोषणा झाल्यास दुसरीकडे महाविकास आघाडीचं काय होणार? पाहूयात.

महाविकास आघाडी काही ठिकाणी ठाकरे बंधूंसोबत निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. तसचं काँग्रेस काही ठिकाणी स्वबळाचा नारा देऊ शकतं. त्याचसोबत महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरील नेत्यांची मतं लक्षात घेऊन पुढील रणनिती ठरवू शकते.

ठाकरे बंधूंकडून युतीबाबत अधिकृत घोषणा केली जात नाही. तोपर्यंत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही सावध पवित्रा घेतलाय. आता ठाकरे बंधूंनी दसऱ्याला एकत्र सोनं लुटलं तर महाविकास आघाडी राज ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र घेणार की भावासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला साईडलाईन करून फक्त ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीला समोरे जाणार, इकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT