Dussehra Maharashtra Politics Saam TV
महाराष्ट्र

Dussehra Maharashtra Politics: दसऱ्याच्या दिवशी ४ मोठ्या घडामोडींवर अवघ्या राज्याचं लक्ष; वाचा सविस्तर

Ruchika Jadhav

Dussehra Melava 2023:

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसऱ्यानिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. अशात राज्याच्या राजकारणात आज दिवसभरात मोठ्या घडामोडी घडणारेत. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर आज दुसऱ्यांदा दोन्ही गटांचा भव्य दसरा मेळावा पार पडणारे. भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील आज आपल्या कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला संबोधित करणारेत. यासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आजचा दसरा महत्वाचा ठरणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ठाकरे गटाचा दसरा मेळावा

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. मेळावा जरी संध्याकाळी सुरू होणार असला तरी सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

2. शिंदे गटाचा दसरा मेळावा...

यासह शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: आझाद मैदनावर जाऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी काही महत्वाचे बदलही सुचवले.आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर येणारेत. त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व चोख व्यवस्था करण्यात आली असून या व्यवस्थेची मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बारकाईने पाहणी केली.

3. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा...

शिवशक्ती परिक्रमेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पहिला दसरा मेळावा आज बीडच्या सावरगाव घाट येथिल भगवान भक्ती गडावर होत आहे. भाजपनेच्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेय. सकाळी ११ वाजता पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होऊन सावरगाव घाटकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत.

पंकजा मुंडे यांचा आजचा कार्यक्रम...

सकाळी 11 वा. गोपीनाथ गड पांगरी येथून हेलिकॉप्टरने भगवान भक्तीगड ता. पाटोदा जि. बीड कडे प्रयाण

सकाळी 11.30 वा. भगवान भक्तीगड येथे हेलिपॅडवर आगमन

सकाळी 11.35 ते 11.50 वा.

ग्रामस्थांच्या वतीने स्वागत (सावरगांव, चिखली,चिंचोली, मुगगांव येथील ग्रामस्थ)

सकाळी 11.55 ते दुपारी 12.10 वा. राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरात दर्शन, आरती व कन्या पूजन

दुपारी 12.15 ते 12.25 वा. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या भव्य मूर्तीस क्रेनने पंकजाताई यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण

दुपारी 12.30 वा. व्यासपीठावर आगमन

दुपारी 12.30 ते 12.40 वा. सत्कार समारंभ

दुपारी 12.40 ते 1 - प्रास्ताविक

दुपारी 1.05 वा. मा. पंकजाताई यांचे मुख्य मार्गदर्शन

4. जरांगे पाटलांची भूमिका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी केलेलं उपोषण सोडून महिना लोटला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारने जरांगेंकडे वेळ मागितला होता. जरांगेनी दिलेली ही मुदत आज संपत आहे. आज शेवटची तारीख असूनही अद्याप आरक्षणावर सरकारकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

5. रोहित पवार

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आज पुण्यात युवा संघर्ष यात्रा निघणार असून याची सांगता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या सभेने होईल. आता पवार या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा’ काढून राज्यातील युवकांचे उभरते नेतृत्त्व अशी प्रतिमा निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. या संघर्ष यात्रेचा प्रारंभ आज पुण्यातून होणार असून, रोहित यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सभा घेऊन सीमोल्लंघन करणार आहेत. पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा संपूर्ण राज्यात जाणार असून याचा दुसरा टप्पा म्हणजे ही यात्रा नागपूरच्या दिशेने जाईल. तरुण पिढीच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार हे सलग ४५ दिवस सुमारे ८०० किलोमीटरचा प्रवास पायी करणार आहेत. या यात्रेदरम्यान तरुणांना येत असलेल्या अडचणी ते समजून घेतील आणि यातून ते सरकारला ही प्रश्न विचारणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT