Dussehra Melava 2023 Saam TV
महाराष्ट्र

Dussehra Melava 2023: दसरा मेळाव्यासाठी ७५ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात, वाहतुकीतही बदल

Dussehra Melava Traffic Rules Changes: मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या आझाद मैदान आणि शिवतीर्थवरील दसरा मेळाव्यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

Ruchika Jadhav

Dussehra Melava:

दसरा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रावण दहनासह देवी विसर्जन आणि शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट ) दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमांमुळे मुंबईमधील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. यासह पोलिसांचा मोठा फौजफाठा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलाय.

नो पार्किंग

SVS रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक), केळुस्कर रोड, दादरमधील दक्षिण आणि उत्तर, दादरमधील एमबी राऊत रोड (एसव्हीएस रोडच्या जंक्शनपासून), दादरमधील पांडुरंग नाईक मार्ग, दादरमधील दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट प्रतिमा ते गडकरी जंक्शन), लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्रमांक ४ ते शितला देवी मंदिर जंक्शन), NC केळकर मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन) दादरमध्ये, ८- एलजे रोड, राजबाडे जंक्शन ते गडकरी जंक्शन. या रस्त्यांवर पार्किंग नसणारे.

बंद मार्ग

SVS रोडवर सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापडा बाजार जंक्शन- माहीमपर्यंत, राजा बधे चौक जंक्शन ते केळुसकर मार्ग (उत्तर) जंक्शन, दादरपर्यंत, लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोडवर पांडुरंग नाईक मार्गावरील जंक्शनपासून दक्षिणेकडील वाहतुकी, दादरमधील गडकरी चौक जंक्शन ते केळुसकर रोड (दक्षिण) या मार्गांवर प्रवेश बंद आहे.

पर्यायी मार्ग

सिद्धिविनायक जंक्शन एसके बोले रोड-आगर बाजार पोर्तुगीज चर्च आणि गोखले रोड, वैकल्पिकरित्या एलजे रोड- गोखले रोड-स्टील मॅन जंक्शन, वैकल्पिकरित्या, लोक राजा बडे जंक्शन मार्गे एलजे रोड. हे पर्यायी मार्ग आहेत.

मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या आझाद मैदान आणि शिवतीर्थवरील दसरा मेळाव्यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दसरा मेळावा, देवी विसर्जन आणि विश्वकपसाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये. यासाठी मुंबई पोलिसांनी बंदोबस्तासाठी ६ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी, १२ हजार ४४९ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणांवर राज्य राखीव पोलीस दलाच्या ३३ प्लाटून, शीघ्र कृती दल व गृहरक्षक दल तैनात करण्यात येणार आहेत. मध्य प्रादेशिक परिमंडळातील पोलिसांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. १०० अधिकारी, ६०० अंमलदार व राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ प्लाटून शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT