Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 'वॉर रूम'ची निर्मिती होणार

Marathi Breaking Live Headlines Updates : दसरा, दसरा मेळावा, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे, मोहन भागवत, आरएसएस, टायगर श्रॉफ, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, हवामानाचे अपडेट, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune: अनधिकृत होर्डिंगवर आता AI ची नजर, पुणे महापालिकेचा नियमबाह्य जाहिरात फलकांविरोधात डिजिटल हातोडा

पुणे - अनधिकृत होर्डिंगवर आता AI ची नजर

पुणे महापालिकेचा नियमबाह्य जाहिरात फलकांविरोधात डिजिटल हातोडा

पुणे शहरातील सव्वा लाखांहून अधिक अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर.

शहरातील होर्डिंग्जचे डिजिटल मॅपिंग आणि विशेष कॅमेऱ्यांच्या मदतीने स्कॅनिंग करण्यात येणार.

महापालिकेच्या अधिकृत डेटाबेसमध्ये नोंद नसलेले होर्डिंग आढळल्यास AI प्रणालीकडून अलर्ट.

अनधिकृत होर्डिंगचा फोटो आणि GPS लोकेशन थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला पाठवले जाणार.

मंजूर आकारापेक्षा मोठे आणि नियमबाह्य होर्डिंग्जही तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखता येणार.

Solapur: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 'वॉर रूम'ची निर्मिती होणार

सोलापूर - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरजिल्हा प्रशासनाकडून 'वॉर रूम'ची निर्मिती होणार

या रूममधून पिण्याच्या पाण्याचा टँकर, चारा यांसह विविध अडचणी सोडविण्यात येतील.

तसेच सावकारांकडून होणारा त्रास, बँका, फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली होऊ नये, यासाठी प्रयत्न होतील अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

Pune: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात रॅपिडो चालकाचे नाव समोर आल्याच्या वृत्ताने खळबळ

पुणे - टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात रॅपिडो चालकाचे नाव समोर आल्याच्या वृत्ताने खळबळ

रॅपिडोच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी व्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची महाराष्ट्र कामगार सभेची मागणी

चालक आणि प्रवाशांची अनिवार्य केवायसी, पोलीस पडताळणी करण्याची मागणी

राष्ट्रीय सुरक्षेला धोका, करसंकलनातील अपारदर्शकता आणि परिवहन विभागाच्या निष्क्रियतेवर उपस्थित केले प्रश्न

रॅपिडोच्या राज्यातील कामकाजावर बंदी घालून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Kolhapur: शारदीय नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा सोहळा

कोल्हापूर- शारदीय नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा सोहळा

हजारो कोल्हापूरकरांची अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेला हजेरी

Nagpur: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदना आणि शस्त्र पूजन

राष्ट्राय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदना आणि शस्त्र पूजन

या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी दाखल

Nagpur: राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित

नागपूर - राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित

- गेल्या काही दिवसांपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्यारे खान विरोधात भूमिका घेत आहेत

- प्यारे खान यांची संघ स्थानी उपस्थिती संघ परिवारात चर्चेचा विषय

- माहितीनुसार संघाच्या निमंत्रणावरून प्यारे खान विजयादशमी सोहळ्यात उपस्थित

Nagpur: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायी दाखल

नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायी दाखल

- महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून भाविक नागपुरात दाखल झाले.

- जय भीमच्या घोषणा देत अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

- जपान, थायलंड आणि श्रीलंकेतूनही बौद्ध भिक्खू दीक्षाभूमीवर आले.

- भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

- दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

- बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर भाविकांची गर्दी कायम होती.

Nagpur: RSS च्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार.

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष.

- संघाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा.

- जगभरातील जेन-झी आंदोलन, तरुणांचा असंतोष, बेरोजगारी, महागाई आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भागवत काय बोलणार, याची उत्सुकता.

Nanded: नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी 

नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

महिलेवर हल्ला करून केले गंभीर जखमी

लाइन गल्लीतील घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Tulajapur: तुळजाभवानी देवीची हत्ती वाहनावरून छबिना मिरवणूक

धाराशिव- तुळजाभवानी देवीची हत्ती वाहनावरून छबिना मिरवणूक

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नवव्या माळेदिवशी दुर्गाष्टमीनिमित्त रात्री काढण्यात आली छबिना मिरवणूक

Mumbai: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त

आज शिवसेनेचा दसरा मेळावा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त

आणि याच दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधत शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात

उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत जीवनावश्यक मदतीच्या साहित्याचे ट्रक दुष्काळग्रस्त भागाकडे रवाना होणार

दुष्काळग्रस्त भागात जात या जीवनावश्यक वस्तूंचे शेतकऱ्यांना वाटप होणार

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, ६ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; आज कुठे कसं राहिल हवामान?

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

SCROLL FOR NEXT