Pandharpur Saam TV
महाराष्ट्र

रेल्वे विभागाच्या 'त्या' निर्णयामुळे मानाच्या पालख्यांना आषाढीवारीसाठी पंढरीत प्रवेश

दोन वर्षानंतर लाखो भाविकांच्या समवेत आषाढी पालखी सोहळा पंढरपुरात येणार आहे. यावर्षी किमान १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या दहा पालख्यांना सरगम चौकातील रेल्वे रूळ ओलांडून पंढरीत (Pandharpur) प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी आणि पालखी प्रमुखांची बैठक पार‌ पडली. या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला आहे. जवळपास दोन वर्षानंतर लाखो भाविकांच्या समवेत आषाढी पालखी सोहळा पंढरपुरात येणार आहे. यावर्षी किमान १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर आतापासूनच पालखी सोहळ्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

आषाढी पालखी सोहळ्याला खूप वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात मानाच्या १० पालख्यांचा समावेश असतो. या पालख्यांतील रथाची उंची ही १२ फुटांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पंढरपुरातील सरगम चौकातील रेल्वे पुलाच्या खालून जाता येत नसल्याने रेल्वे रूळावरून पालख्या जात होत्या. तथापी रेल्वेचे विद्युतीकरण झाल्याने ५.८० मीटर उंचीवरून हाय व्होल्टेज वायर गेली आहे. त्यामुळे काही धोका निर्माण होऊ नये, यासाठी यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. मानाच्या पालख्यांचा मार्ग बदलणे योग्य ठरणार नाही. रेल्वे विभागाच्या (Railway Department) अधिकाऱ्यांनी वारकरी परंपरेचा मान राखून पर्याय सूचवावे असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे ठेवला होता. त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मान्य करत पालख्यांना रूळ ओलांडून जाण्यास परवानगी दिली आहे.

हे देखील पाहा -

पालखी प्रमुखांनी आपापले रथ, पालखी कमीत कमी वेळेत रेल्वे रूळ पार करावा. रथ किंवा पालखी वरून गेली तर इतर वारकऱ्यांनी (Warkari) पुलाच्या खालून जावे. मानाच्या पालख्या सोडून इतर पालख्या रेल्वे रूळाखालून किंवा इतर मार्गाने नेण्यात याव्यात, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे. रेल्वेची भूमिका ही प्रथा-परंपरेनुसार सामंजस्याची राहील. कुर्डूवाडी ते सांगोला (Kurduwadi to Sangola) विद्युत पुरवठा स्थगित करावा लागेल किंवा पालख्या जाईपर्यंत विद्युत तार हटवावी लागेल. दुसरा पर्याय वारी कालावधीत रेल्वे विद्युत इंजिनऐवजी डिझेल इंजिनचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत.

या आहेत मानाच्या दहा पालख्या..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी (रथाची उंची १५ फूट), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू (रथाची उंची २० फूट), श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड (रथाची उंची १४ फूट), श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (रथाची उंची १२ फूट), श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर (रथाची उंची १५ फूट), श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण (रथाची उंची-14 फूट), श्री नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर (रथाची उंची १४ फूट), श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड (रथाची उंची १४ फूट), विठ्ठल रुखुमाई संस्थान कौंडण्यपूर (रथ नाही, वाहनातून पालखी) आणि श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर (रथाची उंची १२ फूट) यापद्धतीने रथांची उंची आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Substitutes: साखरेच्या जागी आजचं खाण्यास सुरुवात करा हे 5 पदार्थ; वजन आणि शुगर दोन्ही राहील कंट्रोलमध्ये

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

SCROLL FOR NEXT