रोहित पवार 
महाराष्ट्र

वीस वर्षांपासून लटकलेला प्रश्न रोहित पवारांमुळे सुटला

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कुकडी प्रकल्पासाठी जमिनींचे भूसंपादन झालेल्या नऊ गावांतील शेतकऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते तब्बल ६१ कोटी ७८ लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यात तालुक्यातील तळवडी, बेनवडी, कोळवडी, होलेवाडी, करमनवाडी, पिंपळवाडी, वडगाव तनपुरा, अळसुंदे, डोंबाळवाडी, म्हाळंगी या गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

कुकडी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन झाले खरे. मात्र, मागील २० वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळाले नव्हते. आमदार पवार यांनी कुकडी प्रकल्पाचा अभ्यास करून पाण्याचे नियोजन करीत घडी बसवली. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मोबदल्याच्या मागणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासनदरबारीही पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून अडकून पडलेली रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना मिळाली आहे. या शेतकऱ्यांना आतापर्यंत ११६ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.

कुकडीच्या अनियमित पाणीवाटपामुळे बुजलेल्या चाऱ्या, तुटलेले गेट, अशा ढीगभर अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेल्या कुकडी प्रकल्पाला पुन्हा उभारी देणे आव्हानच होते. चाऱ्यांची दुरुस्ती, गेटदुरुस्तीची कामे मंजूर करून, प्रसंगी स्वखर्चातूनही पवार यांनी १२० किलोमीटर लांबीच्या दुरुस्तीचा पल्ला गाठला. २३७ गेटच्या दुरुस्तीची कामे मार्गी लागली आहेत.

सुमारे ३१ किलोमीटरच्या अस्तरीकरणाचे काम मार्गी लावले. मागील टप्प्यातही पवार यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना ४९ कोटी रुपये मिळाले आहेत. धनादेशवाटपप्रसंगी पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पवार यांचा सत्कार केला.

विचारात घेऊनच नियोजन

मोबदल्याचा पैसा जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात येतो, तेव्हा शेती व मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची प्रगती साधली जाते. व्यापार-उद्योगाला चालना मिळते. ही रक्कम मिळवून देण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना विचारात घेऊनच पाण्याचे नियोजन होईल.

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड मतदारसंघ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT