Buldhana News
Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पहिल्याच पावसात चार गावांचा संपर्क तुटला...

संजय जाधव

बुलढाणा - लोणार तालुक्यातील महारचिकणा परिसरामध्ये दोन दिवसा अगोदर जोरदार पाऊस (Rain) पडल्यामुळे महारचिकणा नदीवरील तात्पुरता तयार केलेला रस्ता पाण्याच्या वेगाने वाहून गेला. महारचिकणा फाटा ते कोनाटी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून रस्त्याचे काम चालू आहे. नदीवरील पुलाचे बांधकाम संथ गतीने चालु असल्यामुळे मुरूम टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता.

हे देखील पाहा -

पाण्याच्या पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे महारचिकणा, कोनाटी ,देऊळगाव कोळ, या गावाचा संपर्क तुटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गावांमधून येणारा हा मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बी-बियाणे भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी पंचायत निर्माण झाले आहे. पेरणी सुरू होत असून शेतकऱ्यांना शेतात बियाणे व खते कसे न्यावे हा प्रश्न शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पडला आहे.

नदीवरील पुलाचे काम संथ गतीने चालू असून संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पर्यायी रस्ता द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शेतकरी व ग्रामस्थानी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

SCROLL FOR NEXT