Nandurbar News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News: १०० रुपयांसाठी काका झाला हैवान; स्वत:च्याच पुतण्यावर कुऱ्हाडीने केले वार

फक्त १०० रुपये हरवले या कारणाने काकाने आपल्याच पुतण्यावर कुऱ्हाडीने वार केले आहेत.

Ruchika Jadhav

Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. फक्त १०० रुपये हरवले या कारणाने काकाने आपल्याच पुतण्यावर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखामी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Latest Nandurbar News)

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा नवलसिंग पवार असं पुतण्याचं नाव आहे. तर इसाराम हुपा बामणे असं त्याच्या चुलत काकाचे नाव आहे. काकाने कृष्णाला पाचशे रुपयांची नोट दिली आणि पैसे सुटे करून आणण्यासाठी पाठवले. यावेळी कृष्णाने गावातीलच कोणाकडून तरी पैसे सुटे करून आणले.

पैसे घरी घेऊन येत असताना कृष्णाच्या हातून चुकून एक १००ची नोट खाली पडली. आपली नोट पडल्याचे त्याला समजले नाही. घरी आल्यावर काकाला पैसे देताना पाहिले तेव्हा त्याच्याकडे १०० च्या फक्त ४ नोटा होत्या. यात एक नोट कमी असल्याने काकाने कृष्णाला विचारले तेव्हा एक नोट हरवली असे त्याने सांगितले.

पैसे हरवल्याच्या रागातून काका इसारामने कृष्णाच्या पाठीवर थेट कुऱ्हाडीने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला कुऱ्हाडीचा घाव बसल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी रामा जोगी पवार यांनी दिलेला फिऱ्यादीवरून संशयित ईसाराम हुपा बामना यांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हात-पाय दुखतायेत? दुर्लक्ष करू नका, असू शकतात Lung Cancerची लक्षणं; वाचा तज्ज्ञांचे मत

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे महामार्गावर सुट्ट्यांमध्ये वाहतूक कोंडी..

Today Gold Rate : दरवाढीने पुन्हा रेकॉर्ड तोडला, सोनं आणखी महागलं, मुंबई-पुण्यात 24k, 22k, 18k सोन्याची किंमत काय?

Diamond Mangalsutra Design: ऑफिस आणि डेली युजसाठी बेस्ट! डायमंड मंगळसूत्राचे 'हे' 5 लेटेस्ट डिझाईन्स

TMMTMTTM OTT Release : 'तू मेरी मैं तेरा...' रोमँटिक ड्रामा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित, कार्तिक-अनन्याची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT